भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्रामार्फत
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) - भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र धाराशिववतीने १२ जानेवारी रोजी सकाळी १० वा. स्वामी विवेकानंद यांची जयंती,युवा सप्ताह व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सह्याद्री अकॅडमी धाराशिव येथे करण्यात आले आहे.
ही स्पर्धा १५ ते २९ वर्ष वयोगटासाठी असून सात मिनिटांचा वेळ मिळेल स्पर्धेसाठी मेरा भारत विकसित भारत @२०४७ असा विषय असून मराठी ,हिंदी अथवा इंग्रजी भाषेत विषय मांडता येईल प्रथम ,द्वितीय, तृतीय विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल
विजेत्या स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होईल त्यामध्ये प्रथम चार विजेत्यांना एक लाख, ५० हजार व २५ हजाराची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत अधिक माहिती साठी वैभव लांडगे, रवी सुरवसे व प्रशांत मते यांच्याशी संपर्क साधावा