शिक्षणमहर्षी
तात्यारावजी मोरे
आंतर महाविद्यालयीन
वादविवाद स्पर्धा
२०२३ चे आयोजन
शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा-२०२३*
उमरगा (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक चिटणीस शिक्षणमहर्षी कै. तात्याराव मोरे यांच्या स्मरणात गेल्या ३८ वर्षापासून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात येतात. यंदा शनिवार (ता. ३०)ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
'आरक्षण धोरणामुळे गुणवत्तेचा ऱ्हास होत आहे/ नाही' या विषयावर ही स्पर्धा होणार आहे. धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रत्येकी एका संघास या स्पर्धेत सहभाग घेता येणार असून, एका संघात दोन स्पर्धकांचा समावेश असेल यातील एकाने विषयाच्या अनुकूल तर दुसऱ्याने प्रतिकूल बाजूने आपले विचार मांडता येतील. प्रथम संघास दहा हजार एक रुपये व स्मृती चिन्ह, द्वितीय संघास सात हजार एक रुपये व तृतीय संघास पाच हजार एक रुपये तसेच कनिष्ठ महाविद्यालयासाठी उत्तेजनार्थ वैयक्तिक तीन हजार एक रुपयांचे पारितोषिक दिले जाईल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २९ डिसेंबर पर्यंत उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले (मो. ८६६९१४९३९३) यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी केले आहे.