भारतीय जनता पार्टीच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सचिव व जिल्हा प्रभारी मुंबई उपनगर पदी नागनाथ गुट्टे यांची निवड
पुणे (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
नागनाथ गुट्टे यांची भारतीय जनता पार्टी मध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जळकोट तालुक्यातील वडगाव या गावापासून त्यांच्या कार्याची वाटचाल त्यांनी सुरू केली बचत गटाच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व तसेच केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या योजना यांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत फायदा व्हावा या उद्देशाने त्यांनी राबवलेली विविध प्रकारच्या मोहीम,केलेली आंदोलने, विविध योजनांमुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे विविध स्तुत्य उपक्रम राबवून कामाचा ठसा त्यांनी निर्माण केला विद्यार्थी दशे पासून भारतीय जनता पार्टीचे एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रदेश सचिव व मुंबई उपनगर जिल्हा प्रभारी पदी जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडी बद्दल राष्ट्रीय सचिव भाजप मा पंकजाताई मुंडे, उपमुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्री मा चंद्रकांतजी पाटील साहेब, भाजपा प्रदेश अध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुळे,आघाडी प्रदेश अध्यक्ष मा राहुलजी केंद्रे, मा खासदार मा अमरजी साबळे,आमदार मा महेशदादा लांडगे,आमदार मा अश्विनीताई जगताप, आमदार मा उमाताई खापरे, भाजपा शहर अध्यक्ष मा शंकरजी जगताप, प्रदेश सरचटणीस यूमो मा अनुप मोरे,शहर अध्यक्ष युमो मा तुषार हिंगे, माजी अध्यक्ष प्राधिकरण मा सदाशिराव खाडे, माजी अध्यक्ष अण्णा भाऊ साठे महा.मंडळ मा अमितजी गोरखे, माजी अध्यक्ष लेख लेखा समिती मा सचिनजी पटवर्धन,मा महापौर नितीनजी अप्पा काळजे,मा महापौर मा माई ढोरे,मा मा महापौर राहुलजी जाधव, उपमहपौर मा केशव घोळवे,माजी स्थासभापती नितीन लांडगे,नगरसेविका योगीताताई नागरगोजे,मा नगरसेविका सोनालिताई गव्हाणे व इतर भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.