विद्यार्थ्यांनी मोबाईल मध्ये गुंतून न पडता मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे: सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे
श्री छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न .....*
मुरुड (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा )
मुरुड परिसरात नामांकित असणाऱ्या व सीबीएसई चा प्रभावीपणे अभ्यासक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न करुन कै . गोरोबा ( काका ) झाडके यांच्या ध्येयपूर्तीने मार्गक्रमण करणाऱ्या श्री छत्रपती शाहू मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडल्या .
संस्थाध्यक्ष श्री दिपक झाडके , संस्था सचिव प्रा .श्री दत्तात्रय जाधव संस्था कोषाध्यक्ष प्रा.श्री शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून व शाळेच्या प्राचार्या सौ .डी .कांचन यांच्या सुयोग्य नियोजनातून या स्पर्धा घेण्यात आल्या .
स्पर्धेचे उद्घाटक म्हणून मुरुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमान बाळासाहेब नरवटे तर प्रमुख अतिथी म्हणून संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलचे उपप्राचार्य श्री राजेंद्र ढिवरे व हिंदी विभाग प्रमुख श्री माधव नागराळे हे उपस्थित होते तर राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू श्री मधुकर क्षिरसागर , श्री काशीनाथ आणेराव , वैष्णवी इंगळे आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री अविनाश (आबा ) मोरे , संस्था कोषाध्यक्ष प्रा. श्री शंकरराव पाटील , मार्गदर्शक श्री भुजंगराव पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब नरवटे, प्रमुख पाहुणे श्री राजेंद्र ढिवरे , श्री माधव नागराळे , प्रा . मधुकर क्षीरसागर, श्री काशीनाथ आणेराव व वैष्णवी इंगळे तसेच संस्थेच्या प्राचार्या सौ .डी . कांचन उपप्राचार्य श्री उमेश कुंभार , समन्वयक श्री रामेश्वर शेटे , समन्वयिका सौ .धनिषा नागराळे , क्रीडा शिक्षक राजेश बावळे व बालाजी भिसे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या .
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री बाळासाहेब नरवटे म्हणाले की मुलांनी टीव्ही , मोबाईल यात जास्त गुंतून न पडाता मैदानी खेळाकडे लक्ष द्यावे जेणेकरून शारिरीक प्राबल्य वाढून त्यांना विविध ठिकाणी संधी प्राप्त होते . तर , आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्या सौ . डी . कांचन यांनी खेळाचे महत्व विद्यार्थी व पालक यांना पटवून देऊन शारीरिक व मानसिक मनोबल वाढीसाठी खेळ हा अतिशय महत्त्वाचा आहे . त्यासाठीच शाळेने या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे .असे त्या म्हणाल्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता , समानता व सांघिकवृत्ती निर्माण होते त्यामुळेच याचे नियोजन करण्यात आला आहे असेही त्या म्हणाल्या .
वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही प्रकारचे विविधांगी खेळ यात घेण्यात आले . त्याचबरोबर पालकांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या यात महिला व पुरुष पालकांनी मोठा प्रमाणात सहभाग नोंदवला कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता . विद्यार्थ्यांचा क्रिडात्मक विकास साधून त्यांना स्पर्धेसाठी तयार करणे हाच यामागचा महत्त्वपूर्ण उद्देश होता जो शाळेने अगदी उत्तमरीत्या साध्य केला आहे . सदरील क्रीडा स्पर्धेत शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी उतस्फुर्त सहभाग नोंदवला होता .
सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचल व आभार रामेश्वर शेटे , वैशाली देशमुख , शांती मार्डी , आदित्य सिंग यांनी कले . विद्यार्थांमध्ये स्फुर्ती निर्माण व्हावी म्हणून सुरुवतीला मध्ये व शेवटी नृत्याचे आयोजन केले होते क्रिडा स्पर्धेचे ते महत्वपूर्ण आकर्षण ठरले .
स्पर्धेनंतर विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरणही करण्यात आले प्रमाणपत्र व मेडल असे बक्षीसाचे स्वरूप होते . त्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदून गेले होते . एक नियोजनबद्ध कार्यक्रम शाळेने साकारला म्हणून पालक वर्गातून शाळेचे कौतुक केले जात आहे .