>

भैरवनाथ शुगर्स संचलित तेरणा साखर कारखान्याची पहिली उचल २८२५ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा


 भैरवनाथ शुगर्स संचलित तेरणा साखर कारखान्याची प्रतिटन २८२५ रुपये पहिली उचल खात्यावर जमा

ढोकी, ५ डिसेंबर २०२३ 

-(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा )भैरवनाथ शुगर्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांनी प्रतिटन पहिली उचल २८२५ रुपये देऊन जिल्ह्यात एक नवा इतिहास निर्माण केला आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे. अशी माहिती तेरणेचे कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांनी दिली.

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा तीन तालुक्याचा आधार आहे. तसेच चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत,  कार्यकारी संचालक विक्रम उर्फ केशव सावंत यांनी केलेले परिश्रम याचे सुद्धा हे फलित आहे. त्यामुळेच धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी बोललेला शब्द खरा करून दाखविला अशी चर्चा पंचक्रोशीत सुरू आहे.

     कारण तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा यासाठी जो प्रयत्न झाला त्याचे आज फळ मिळताना दिसत आहे.

 तसेच कार्यकारी संचालक विक्रम सावंत पुढे म्हणाले की, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मोळी पूजन १४ नोव्हेंबर २०२३ रोजी झाले. त्याच अनुषंगाने तेव्हा पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली की माझ्या शेतकऱ्याला पहिली उचल २८२५ रुपये देणार व त्यानंतर सर्वांपेक्षा २१ रुपये भाव अधिक देणार आहे. त्याच्याच औचित्याने पहिली उचल २८२५ रुपये बँकेत जमा केलेली आहे. ती त्यांना जयवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मार्फत बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

शेतकऱ्यांनी ऊस देऊन तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला सहकार्य करावे असेही सावंत यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलेले आहे.

धाराशिव जिल्ह्यात २०२३-२४ या हंगामात  साखर कारखाने, ॲग्रो इंडस्ट्रीज (गुळ पावडर ) ते ऊस गाळप करीत आहेत.

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यांचे ऊस गाळप युद्धपातळीवर आहे. त्यात त्यांनी एवढी पहिली उचल कुठल्याच कारखान्याने दिलेली नाही.

सांगण्याचे तात्पर्य खालील प्रमाणे

१)भैरवनाथ शुगर्स संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन पहिली उचल २८२५ रुपये देऊन जिल्ह्यात एक नवा इतिहास निर्माण केला आहे. 

२)यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post