कोरोनाला घाबरून न जाता स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी-डॉ.प्रतापसिंह पाटील
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)-धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यामध्ये कोरोनाचा जेएन-1 या व्हेरियंटचा रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी डॉक्टर म्हणून माझी सर्व नागरिक बंधू भगिनींना विनंती आहे की,कोरोनाला घाबरून न जाता काळजी घ्यावी,सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा त्यासोबतच घरी उकळून पाणी प्यावे.दक्षता घेतल्यानंतर कोरोनाची भीती बाळगता आवश्यकता नाही मात्र काळजी घेणं आवश्यक आहे.प्रशासनही त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र तरीदेखील आपण देखील काळजी जर घेतली तर या कोरोनावर आपण यापूर्वी मात केलेली आहे आता देखील मात करू.
नवीन वर्षाचे आगमन होणार असल्यामुळे त्याचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.अशा वेळी लोक पर्यटनस्थळे,धार्मिक स्थळी जातात. मात्र नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी कोविड अनुरूप नियमांचे पालन करणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे. जोखमीच्या रुग्णांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.