पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळेच भाजपची विजयश्री...
पाच राज्याच्या निवडणुकीचे विश्लेषण...
धाराशिव (सा. संत गोरोबाकाका समाचार वृत्तसेवा) देशात नुकत्याच पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या त्यात मोदींनी घेतलेल्या सभा व रॅली यामुळे भारतीय जनता पार्टीचा एक मुखी विजय झालेला आपल्याला दिसून येत आहे. तेलंगाना भाजपच्या वाढलेल्या विधानसभेच्या जागा तसेच मताची टक्केवारी बऱ्याच काही गोष्टी सांगून जाते. कारण मोदीचा जादू ही कायम आहे हे मात्र तितकेच नक्की आहे.
भारतीय जनता पार्टी यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये एक मुखी विजय मिळत गेल्या पाच वर्षातील झालेला बॅकलॉक भरून काढला. मध्यप्रदेशचा बॅकलॉग तर गेल्या तीन वर्षांपूर्वीच भरून काढला होता. मध्यप्रदेशचे जर उदाहरण घ्यायचे झाले तर मध्यप्रदेश मधील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उर्फ मामा यांची भावांतर योजना व लाडली ही योजना ही महत्वपूर्ण ठरली. तसेच राजस्थानमध्ये दर पाच वर्षाला सत्ता बद्दल यामुळे सरकार बदलले. तर छत्तीसगडमध्ये धान पिकाला जो हमीभाव आहे तो रमण सिंग सरकारने अधिक तिला व काँग्रेस सरकारने कमी दिला याची सर्वत्र चर्चा झाली. हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरला. त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीचे मताची टक्केवारी वाढली आहे. तेलंगाना मध्ये भारतीय जनता पार्टीला १३.८१% एवढे मताधिक्य मिळाले. २०१८च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दोन जागेवर समाधान मानावे लागले होते आता भारतीय जनता पार्टीचे आठ आमदार तेलंगणामध्ये आहेत. तसेच तेलंगणामध्ये काँग्रेसचे रेवंथ रेड्डी यांचे अभिनंदन करायला पाहिजे. कसा प्रदेशाध्यक्ष असावा तर तो रेवंथ रेड्डी सारखा असावा. खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रचाराची शैली ही बरेच काही सांगून जाते. सुरुवातीपासून ते म्हणले की, त्यांचा आत्मविश्वास असा होता की काँग्रेसचे सरकार येईल व ते तेलंगणात आले. लवकरच रेवंथ रेडी यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल याबद्दल मुळीच शंका नाही. त्यात तेलंगणामध्ये काँग्रेसला ३९टक्के तर बी आर एस ला ३७ टक्के मतदान मिळाले. टक्केवारीत असा काही फरक नाही मात्र जागेत फरक पडला.
तर मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीने १६६ जागेवर विजय मिळवला. तर काँग्रेसने केवळ ६३ जागेवर विजय मिळवला. मात्र तेथे भारतीय जनता पार्टीला ४८ टक्के मतदान मिळाले तर काँग्रेस पार्टीला ४० टक्के मतदान मिळाले. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये यावेळी भारतीय जनता पार्टीचे गट तट विसरून एकत्र काम केले. तेथे सुद्धा एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची आली भारतीय जनता पार्टीला राजस्थानात ११५ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाला केवळ ६३ जागेवर समाधान मानावे लागले. मात्र भारतीय जनता पार्टीला ४१ टक्के मत मिळाली तर काँग्रेस पक्षाला ३९ टक्के मते मिळाली. टक्केवारीत फरक नाही मात्र निवडून येण्याच्या जागेत फरक पडला असेही दिसते. छत्तीसगड या राज्याची निवडणूक महत्वपूर्ण ठरली गेल्यावेळी काँग्रेसला एक हाती सत्ता मिळाली मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता मिळाली. भाजपला ५४ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षाला ३४ जागेवर समाधान मानावे लागले. भाजपला ४६ टक्के मतदान झाले तर काँग्रेसला ४२ टक्के मतदान झाले. काँग्रेस पक्षाचे मतदान वाढले मात्र जागा मात्र वाढल्या नाहीत हे मात्र फार मोठी शोकांतिका आहे.
मिझोरम मध्ये तर तेथील स्थानिक आघाडी झेड पी एम ने २६जागा मिळवीत आघाडी घेतलेली आहे. तेथे त्यांचेच प्राबल्य होणार आहे हे मात्र नक्की आहे.
विश्लेषण करायचे झाल्यास भारतीय जनता पार्टीचे विजयात फक्त नरेंद्र मोदी यांच्या नावानेच निवडणुका लढविल्या आहेत. कारण भारतीय जनता पार्टीने कुठल्याच राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा जाहीर केलेला नव्हता. त्यामुळे मोदी की गॅरंटी व गॅरंटी मोदी हा फॅक्टर हा ठरला व भारतीय जनता पार्टीचा हा फॉर्म्युला ठरला. त्यामुळे मोदी है तो मुनकीन है.