भविष्यात फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना खूप महत्त्व येणार-डॉ.विश्वनाथ पावडशेट्टी
डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलात फिजिओथेरपीच्या नूतन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
सध्या मुलांचा कल हा एमबीबीएस
,बी.ए.एम.एस.कडे असला तरी देखील भविष्यामध्ये फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना देखील खूप महत्त्व येणार असल्याचे प्रतिपादन
लातुर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी कॉलेजच्या हृदयरोग विभागाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.विश्वनाथ पावडशेट्टी यांनी केले ते धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.आर.एम. लड्डा यांच्या शिकवणी वर्गाचे संस्थापक आणि संचालक डॉ. विनोद लड्डा,एस.पी. पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अमर कवडे व वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्रभारी प्राचार्या डॉ. उमादेवी पावडशेट्टी,डॉ.कोमल ठाकूर, डॉ.पुजा आचार्य या होत्या.
पुढे बोलताना डॉ.विश्वनाथ पावडशेट्टी म्हणाले की, फिजियोथेरपी हा कोर्स जुना जरी असला तरी देखील हा विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत अजून पोहोचलेला नाही.फिजिओथेरपिस्ट यांना भविष्यात जगात मागणी असणार आहे त्यामुळे हे शिक्षण घेणारे विद्यार्थी खऱ्या अर्थाने पुढील काळात लोकांच्या आरोग्याची काळजी घेतील अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना
डॉ.आर.एम.लड्डा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास सातत्याने केला पाहिजे त्यासोबतच ज्या क्षेत्रात आपण आहोत तेच क्षेत्र सर्वोत्कृष्ट कसे बनेल या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहावे तर प्राचार्य अमर कवडे यांनी देखील फिजिओथेरपी ही भविष्यामध्ये खूप महत्त्वाची आरोग्यसेवा ठरणार असून अनेक लोकांना आरोग्याचे प्रश्न जे भेडसावत आहेत त्याकरिता फिजिओथेरपिस्टांची गरज भासणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्रभारी प्राचार्य डॉ. उमादेवी पावडशेट्टी यांनी सांगितले की,संस्थेच्या वतीने आपल्या महाविद्यालयात अनेक सुखसोयी देण्याचा प्रयत्न सातत्याने होतो. विद्यार्थ्यांनी देखील पुढील चार वर्ष हा कोर्स पूर्ण करत असताना शिस्त अंगी बाळगून ज्ञानार्जन करावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया सय्यद व रिया शिंदे यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिपिक कृष्णा दळवी यांच्यासह वेलनेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.