आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून एम.फार्मसी सुरू
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)-डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी.औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्येे डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली मार्फत पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून "मास्टर ऑफ फार्मसी" करिता मान्यता मिळाली आहे. सदरील मान्यता ही दोन मानांकित विभागासाठी आहे.सदरील विभाग हे "फार्मासूटिकल केमिस्ट्री "आणि " फार्मॅकोलाॅजी" असे आहेत.असे विभाग प्राप्त करणारे हे जिल्ह्यातील एकमेव औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आहे ,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी दिली.
कोरोना नंतर फार्मसी क्षेत्राचे वाढत चाललेले महत्त्व, निर्माण झालेल्या संधी,संशोधन क्षेत्र ,कार्यकुशल मनुष्यबळ, यासारख्या अनेक गोष्टी भारत जागतिक पातळीवरती जगाला देत आहे.गेल्यावर्षी याच संधीचे सोने करून आपल्या महाविद्यालयातील 43 विद्यार्थी विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवडले गेले.याचा फायदा ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळण्यासाठी झाला व त्यामुळे कुटुंबाला आधार मिळाला.याबरोबरच महाविद्यालयातील अनुभवी प्राचार्य व प्राध्यापक वृंद यांच्या नावे जागतिक स्तरावरील वेगवेगळे पेटंट उपलब्ध आहेत.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकित जर्नल मध्ये संशोधन प्रकाशित झालेली आहेत.तरी जिल्हातील व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घेऊन स्वतःचे करियर उत्तम घडवावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले शेवटी प्राचार्य व प्राध्यापक वृंद, इतर कर्मचारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.