>

गट विकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित


गट विकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

*धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण करण्यात आले होते. त्यामुळे यात्रा व धार्मिक कार्यक्रमाला अडचण येत असल्यामुळे ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे या मागणीसाठी दि.३० नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. मात्र, कळंब पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी ते अतिक्रमण १५ दिवसांच्या आत काढण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने हे आमरण उपोषण दि.१ डिसेंबर रोजी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.**

**दहिफळ येथील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानाला दि.३० नोव्हेंबर रोजी गट विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक्षदर्शी पाहणी केली. मंदिर परिसराभोवती अतिक्रमण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रामपंचायतीने मोजणी करून  व तो अहवाल पंचायत समितीला कळवावा अशा सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच, कारवाई न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

**यावेळी ग्रामपंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए.एस.गपाट, सरपंच चरणेश्वर पाटील, ग्राम विस्तार अधिकारी हनुमंत झांबरे, ग्रामपंचायत सदस्य वसंत धोंगडे, समाधान मते, रंजीत काकडे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी उपोषणकर्त्यांना पत्र व ज्यूस देऊन उपोषण सोडवले. या उपोषण आंदोलनामध्ये पांडुरंग मते, जयवंत भातलवंडे, पांडुरंग भातलवंडे, सज्जन कोठावळे, तुकाराम भातलवंडे, नारायण ढवळे यांचा सहभाग होता. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रसिद्ध प्रमुख सलीम पठाण, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, किरण कांबळे, प्रशांत मते, खंडेराया भातलवंडे, शिवशंकर भातलवंडे यांचीही उपस्थिती होती.

**उपोषणकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिफळ येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदिर परिसरात काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मंदिराच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येत आहेत. तसेच, धार्मिक कार्यक्रमांनाही अडचण येत आहे. यामुळे, उपोषणकर्त्यांनी मंदिर परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी केली होती.*

**गट विकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. तथापि, १५ दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्यात आले नाही तर ते पुन्हा उपोषण सुरू करतील असा इशारा त्यांनी दिला आहे.**

Post a Comment

Previous Post Next Post