>

युनिक क्लासेसची गगन भरारी : संचालक संदीप पवार सर


 *युनिक क्लासेसची गगण भरारी*


*संचालक: संदीप पवार सर*

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जुनी सांगवी परिसरात विधार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला व त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं कार्य जिथे केले जाते ते म्हणजे युनिक क्लासेस होय.संस्कार ,अपार मेहनत,शिस्त,याचा वास्तू पाठ म्हणजे युनिक क्लासेस होय.जेव्हा एखाद्या विधार्थी आठवी,नववी, दहावीला प्रवेश घेतो तेव्हा मागील वर्षाचा निकाल पत्र आणि शिक्षण शिकत असलेल्या वर्गाचे अंतिम निकाल पत्र यातील गुणांचा चढता आलेख पाहिला की मग आपोआपच लक्षात येते.या विधार्थ्याच्या पंखामध्ये बळ कुठून येतं.युनिक क्लासेस ची वाटचाल ही रौप्यमहोत्सवी वर्षाकडे होत आहे.२०२४-२५मध्ये पंचवीस वर्षे पूर्ण होतील.तेव्हा मागे वळून पाहिले की या  क्लासेसने समाजातील या पंचवीस वर्षांत शेकडो, डॉक्टर, इंजिनिअर, वकील,अधिकारी, व्यावसायिक,उधोगपती घडवून समाजाचा सामाजिक स्तर उंचावण्यात  युनिक क्लासेसचे खूप मोठे योगदान आहे.युनिक क्लासेसचे संचालक आदरणीय संदीप पवार सर व सौ.शुभांगी संदीप पवार मॅडम यांचा उदात्त दृष्टीकोन यामुळेच आज युनिक क्लासेसमधिल अनेक विधार्थी हे जगातील विविध देशांत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आसून त्यांच्याबदल राष्ट्राला तर अभिमान आहेच,त्यासोबत ते युनिक परिवारातील सदस्य आहेत याचा सुध्दा सार्थ अभिमान आहे.कोणतेही मंदिर,एखादी उंच इमारत उभी रहाण्यासाठी जशी जमिनीमध्ये पाया खोलवर खोदून तो भरला जातो,त्यावर जशे पिलेर उभे केले जातात,त्यावर उंच असा मनोरा उभा असतो किंवा एखादे झाड मोठे होण्यात त्यांच्या मूळानी स्वतः ला खोल खोल मातीमध्ये गाढून घेतलं आहे त्यांच्यामुळेच एवढा सुंदर हिरवागार वटवृक्ष उभारलेला उनपावसाळे झेलत उभा आहे त्याचप्रमाणे या युनिकचे जे लाखमोलाचे स्तंभ आहेत, ते म्हणजे गणेश माने सर, अनिकेत जाधव सर, ओमकार सर,तिलक बहादूर थापा व यांना साथ देऊन विधार्थी घडवणारे ध्येयवादी शिक्षक या सर्वांमुळे आज

युनिक क्लासेसने आजपर्यंत जी दैदिप्यमान अशी कामगिरी केली आहे,करीत आहे त्या यशात यांचा लाखमोलाचा वाटा आहे हे विसरता येणार नाही.

ज्यांच्या चेहऱ्यावर तेज, तपस्या, प्रगल्भ ईच्छा शक्ती, प्रचंड मेहनती, पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत ज्यांच्या नसानसात विधार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, विधार्थ्याना जास्त वेळ बसवून अभ्यास करून घेतला पाहिजे.सोपी गोष्ट अवघड करून सांगतात ते विचारवंत असतात पण अवघड गोष्ट सोप्यात सोपी करून समजावून सांगतात त्यांना संदीप पवार सर म्हणतात.सरांचं वैशिष्ट्ये असे की त्यांचा सर्वंच विषयावर प्रभुत्व आहे,हे विशेष त्यांच्यातील सद्गुण म्हणावा लागेल.त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही ही आळस अवतीभोवती सुध्दा कधी त्यांनी येऊ दिले नाही.या शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा बाजार झाला आहे.पण अशा बाजारात पण संस्कार, विधार्थ्याना त्यांच्या भविष्याची जाणीव करून देऊन त्यांना घडविण्यात एक समाधान आहे.

संदीप सर सहज बोलून जातात,माझा विधार्थी हा जगाच्या बाजारात कोठेही गेला तरी टिकला पाहिजे,झळकला पाहिजे, त्याच्या क्षेत्रात तो चमकला पाहिजे.हिच तर युनिकची ओळख आहे.

इथे प्रवेश घेणारा विद्यार्थी खूप विचार करून आणि मोठी स्वप्ने घेऊन प्रवेश घेतो.त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्याचे अविरत कार्य इथे वर्षानूवर्ष चालू आहे.तुमच्या मुलांना प्रवेश द्या . आमच्यावर विश्वास ठेवा.तूमच्या मुलांचा चंदनाप्रमाणे समाजात नावलौकिकतेचा सुगंध पसरविण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करुन मुलांकडून मेहनत करून घेऊ.हेच तर युनिकमधिल विधार्थ्याच्या प्रगतीचे खरे रहस्य आहे.

आज शिक्षणाच्या दोलायमान परिस्थितीमध्ये आम्ही काळाची पावले ओळखून आम्ही ही शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करून मुले घडवित आहोत.दर रविवारी विधार्थ्याची एका विषयावर परीक्षा घेतली जाते.यातून स्वतः ला अपडेट असं ठेवता येईल.एका आठवड्यात झालेल्या अभ्यासक्रमावर लगेच परीक्षा व त्या मुलाचे अभ्यासातील गुणवत्तेचे मुल्यमापन केले जाते.त्यातून अजून काय सुधारणा करायला हवी हे स्वतः संदीप सर सांगत असतात.

संदीप सर म्हणतात,"मेहनत करा आणि यशस्वी बना !‍"इतकं साधं तत्वज्ञान देऊन मुले संस्कारमय व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा एकमेव क्लास म्हणजे युनिक क्लासेस होय.! विधार्थ्याच्या भविष्याबदल एवढंच म्हणेन..!


स्वप्नांना ही शिकवतो आम्ही

भरारी कशी मारायची

विश्वास असू दे 

तुझ्या मनगटाच्या बळावर

जिद्द उरी जिंकण्याची..!


सुनील वामनराव दोरवे

पुणे

Post a Comment

Previous Post Next Post