>

अँजेलो मॅथ्यूज यांच्यावर खरोखरच अन्यायच !


अँजेलो मॅथ्यूज यांच्यावर खरोखरच  अन्यायच.....!
वेळ संपला हा नियमच वेगळाच?
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
गेल्या दोन दिवसात संपूर्ण जगभरात श्रीलंका बांगलादेश चा सामना झाला. ६ नोव्हेंबर रोजी हा सामना खेळण्यात आला. त्यात चर्चा झाली ती बांगलादेश कर्णधार शाकिब च्या  हस्तक्षेपावर श्रीलंकेचा खेळाडू  अँजलो मॅथ्यूजचा वर खरोखरच अन्याय झाला आहे का? अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळताना हे एकमेकांच्या चुका काढून त्यांना बाद करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्या खेळाडूला अपमानास्पद वागणूक देताना पंच काय करत होते हा सुद्धा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. खरोखरच जर आपण विचार केला तर जागतिक क्रिकेट मंडळ अथवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांनी कुठल्या बाजूने हे स्वीकारले हे मात्र आत्मपरीक्षणाची गरज आहे. कारण त्यावेळी पंच दोशी का बांगलादेशचा कर्णधार शाकिब दोषी असा प्रश्न निर्माण होतो. अँजेलोमॅथ्यूज जर रणांगणावर राहिला असता तर बांगलादेश तो सामना जिंकत नव्हता. ही सुद्धा भीती बांगलादेश ला असू शकते. त्यामुळे आपण काय करतो याचे भान क्रिकेट मंडळाला आहे का.? वेळ संपला हा नवीनच नियम ऐकण्यात आला.
      क्रिकेटची ज्यावेळेस निर्मिती झाली ती लंडन होऊन होय. क्रिकेटचा असा नियम आहे की एखादा खेळाडू बाद झाला तर तो ३ मिनिटाच्या आत मैदानात आला पाहिजे. मात्र मॅथ्यूज हे दोन मिनिटातच मैदानावर नवीन हेल्मेट घेऊन आले होते. आता हा कुठल्या नियमात त्याला बाद करणे हा वादाचा विषय आहे आणि त्याचा निकाल लावलाच पाहिजे.
     ‌ एखादे षटक संपल्यानंतर फलंदाज पाणी पिण्यासाठी पाण्याला पाचरण करतो. तेव्हा जवळपास चार ते पाच मिनिटांचा खेळ थांबलेला असतो. तेव्हा दोन्ही संघावर कारवाई झाली पाहिजे मात्र तसे होत नाही. इकडे नियमाचे उल्लंघन झाले नसताना सुद्धा श्रीलंका संघावर अन्याय झाला हे मात्र चुकीचे आहे. बांगलादेश जर पुन्हा एखाद्या संघ विरुद्ध खेळताना जराशी काही घटना घडली पाणी पिण्यास उशीर झाला तर त्या पूर्ण संघाला बाद ठरवले चालेल का? तेव्हा ते नियोजन करायचे आहे ते करा मात्र आधी बांगलादेश संघावर अथवा कर्णधारावर कारवाई झाली पाहिजे.
           श्रीलंकेचा संघ केव्हा जिंकतो केव्हा हरतो तो विषय वेगळा असतो. मात्र एखाद्या संघाला जाणून बुजून त्रास देणे हे चुकीचे आहे. तेव्हा अशी घटना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ,इंग्लंड संघाबरोबर झाली असती तर असेच झाले असते का? व इतर कुठलाही देश कुणी खपवून घेतले नसते. तेव्हा कारवाई झाली पाहिजे. व  अँजेलो मॅथ्यूजचा खरोखरच  अन्यायच...!

Post a Comment

Previous Post Next Post