४१६० कोटी आशियाई विकास बँकेच्या कर्जातून धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गती :. आ. राणाजगजीतसिंह पाटील
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
महाराष्ट्रातील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाचे बळकटीकरण यासाठी आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून ५०० दशलक्ष डॉलर (जवळपास रु ४१६० कोटी) उपलब्ध होणार असून यातून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इमारत बांधकाम व यंत्र सामग्रीसाठी ही मंजूर निधी प्राप्त होणार असल्याने या कमाल मोठी गती मिळेल असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी व्यक्त केला आहे.
सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या करिता देशात जास्तीत जास्त वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने महायुती सरकारने मोठा निधी प्राप्त करून घेतला आहे. या निधी मधून राज्यातील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकरीता निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
ठाकरे सरकारने वैद्यकीय महाविद्यालयला आवश्यक प्राध्यापक, कर्मचारी व यंत्रसामग्री उपलब्ध करून न दिल्याने राष्ट्रीय आयुर्विद्यान संस्थेने प्रवेश नाकारले होते. राज्यात सत्तांतरण होताच या कामाला गती देत आवश्यक पूर्तता करून फेर तपासणी करून घेण्यात आली व ठाकरे सरकारच्या काळात नाकारलेली एम बी बी एस प्रवेश मान्यता मंजूर करून घेतली.
नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागलेला असून आशियाई विकास बँकेने मंजूर केलेल्या निधी मुळे आयटीआय च्या जागेत सुसज्य इमारत बांधकाम, रुग्णालय व यंत्रसामग्रीसह वैद्यकीय संकुलाचे कार्य अधिक वेगाने होण्यासाठी मोठे सहकार्य होणार आहे.
जागतिक यंत्रणांकडून वैद्यकीय सुविधांसाठी आर्थिक व तांत्रिक मदत प्राप्त करून घेतल्याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी केंद्र व राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत.