विराट कोहली रवींद्र जडेजा ची कमाल तर दक्षिण आफ्रिकेची दाणादाण...
धाराशिव :(सा.संत गोरोबा काका वृत्तसेवा) विराट कोहली रवींद्र जडेजा ची कमाल तर दक्षिण आफ्रिकेचे दाणादाण परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळाली.
भारतात विश्वचषकाची वारे वाहू लागलेले आहे. त्यात भारत हा काही कमी राहिलेला नाही. भारताने साखळी सामन्यात सलग आठवा विजय संपादन करून सर्व जगाला धक्का दिला. आतापर्यंत एवढे विश्वचषक झाले. साखळी सामन्यात सलग एवढे विजय कोणीच प्रस्थापित केलेले नव्हते. तो मग आज भारताला मिळत आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांचा सामना सदैव अटीतटीचा राहत असते. त्यात काल भारताने प्रथम फलंदाजी करत पाच बाद ३२६ गावाचा डोंगर दक्षिण आफ्रिकेसमोर उभा केला. भारताची फलंदाजी संयमाने झाली . संघाची धावसंख्या ६२ होते तेव्हा रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर ९३ धावसंख्या असताना शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर विराट कोहली व श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिका फलंदाजाची अगदी दानादान केली. तिसरा गडी तब्बल संघाची धावसंख्या २२७ असताना बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादव रवींद्र जडेजा यांनी तुफानी बल्लेबाजी केली. मात्र राहुल हा केवळ ८ धावावर बाद झाला. रवींद्र जडेजा यांनी २९ धावा काढले त्यात तीन चौकार व एक षटकार चा समावेश आहे.
त्यानंतर फलंदाजीसाठी आलेली दक्षिण आफ्रिका संघ सदैव आत्मविश्वास घेऊन येत असते, मात्र त्यांचा हा आत्मविश्वास फोल ठरला. व जसजशी धावसंख्या वाढत होती तसतशी त्यांचे गडी बाद होत होते. दुसऱ्याच षटकात मोहम्मद शिराज ने डिकॉक ला त्रिफळाचीत करून आफ्रिका संघाची घसरगुंडी सुरू झाली. त्यानंतर संघाची धावसंख्या 22 असताना सुद्धा बावूमा ला रवींद्र जडेजाने त्रिफळाचीत केले. त्यानंतर मारकम ला मोहम्मद शमीने ने राहुल यांच्या हातात झेल देऊन बाद केले. त्यानंतर जानसेन, मिलर ,क्लासेन, रबडा यांना बाद करून रवींद्र जडेजा यांनी पाच गडी बाद केले . तर उर्वरित संघाला कुलदीप यादव, मोहम्मद शमी, बुमराह मोहम्मद सिराज यांनी बाद केले. त्यांचा संघ ८३ धावावर बाद झाला. व भारताने २४३ धावांनी विजय मिळवला.