अग्रीम पिक विमा विषयी तालुका कृषी कार्यालयातील विमा प्रतिनिधीशी संपर्क करा .
जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे शेतकऱ्यांना आवाहन*
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
:-प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ मध्ये धाराशिव जिल्हयातील ७५७८५३ अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविलेला होता जिल्ह्यातील सर्व सोयाबीन विमाधारक पात्र शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा रक्कमेचे विमा कंपनीमार्फत वितरण चालू आहे. हे वितरण आधारलिंक बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा पिक विमा जमा न झाल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत, शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप जमा झालेला आहे किंवा नाही याचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात पुढील 4 ते 5 दिवस विमा प्रतिनिधींना बसविण्यात येणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन आपली पिक विम्याची रक्कम कोणत्या खात्यावर जमा झालेली आहे याची चौकशी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
ज्या शेतकऱ्यांचा अर्ज दुरुस्तीसाठी रिव्हर्ट आलेला आहे अशा शेतकऱ्यांनी ज्या ऑनलाईन सेंटरवरुन विमा भरलेला आहे त्या ऑनलाईन सेंटरवर जावून दुरुस्तीसाठीची आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन घ्यावीत, आपण कागदपत्रे अपलोड केल्यानंतरच विमा भरपाई रक्कम आपल्या खात्यावर जमा होईल, ज्या शेतकऱ्यांची विमा भरपाई रक्कम रु.1000/- पेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांची उर्वरीत रक्कम शासनाकडून प्राप्त झाल्यानंतरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बरोबर रक्कम रु.1000/- जमा करण्यात येईल,ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे विमा भरलेले क्षेत्र 7 हेक्टर पेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांच्या क्षेत्राची पडताळी करण्यात येणार असुन पडताळणीचे काम पुर्ण झाल्यानंतरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा भरपाई रक्कम जमा होईल.
वरील कारणाव्यतिरिक्त इतर कारणामुळे पिक विमा रक्कम जमा झालेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेल्या संबंधित तालुक्यातील संबंधित विमा प्रतीनिधीकडे विमा रक्कम जमा न होण्याचे कारणबाबत चौकशी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
कार्यालय विमा प्रतिनिधीचे नाव मोबाईल क्रमांक पुढील प्रमाणे
तालुका कृषि अधिकारी कार्यालय धाराशिव- सुमेध लांडगे- 9922251357, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- तुळजापूर- रोहीत आलाट-9518523476, तालुका कृषि अधिकारी, कार्यालय-उमरगा- अक्षय निंबुर्गे- 9420750582, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- लोहारा- रामेश्वर बिराजदार- 9325843396, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- भूम- गणेश कावळे- 8830421143, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- परंडा- तेजस अनभुले -9552831863, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- कळंब- ज्ञानेश्वर शिंदे- 9881450381, तालुका कृषि अधिकारी कार्यालय- वाशी- रामेश्वर सुरवसे- 9403081038
****