पाच राज्यात काँग्रेस व सहकारी पक्ष बहुमताने सरकार बनविणार: विश्वासअप्पा शिंदे माजी जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस धाराशिव
धाराशिव: (सा संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस व आमचे सहकारी पक्ष मिळून सरकार बनविणार. व येणाऱ्या लोकसभेत देशात काँग्रेसचे व आमच्या सहकारी पक्षाचे बहुमताने सरकार येऊन सर्व जनतेला न्याय देणार आहोत. अशी माहिती काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वासअप्पा शिंदे यांनी दिली.
देशात आज मध्यप्रदेश, छत्तीसगड ,राजस्थान ,तेलंगणा व मिझोरम या राज्यामध्ये निवडणूक सुरू आहे. निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ताकद अधिक आहे. अशी प्रतिक्रिया
विश्वासअप्पा शिंदे यांनी सा. संत गोरोबा काका समाचार या वृत्तपत्राला माहिती दिली, त्यावेळी ते बोलत होते . तसेच ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन-तीन वर्षापासून भाजपा व मोदी सरकार खाजगीकरण, बेरोजगारी, महागाई, आणि जातीयतेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच देशातील वातावरण खराब केले आहे. अशा वेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशभर एकतेचा संदेश दिला. राफेल घोटाळ्यास भाजप सरकार जबाबदार असून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. देशात वाढत चाललेली महागाई रोखण्यासाठी व भारत देश एक संघ ठेवण्यासाठी देशातल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या विधानसभा लोकसभा महापालिका सर्व ठिकाणी काँग्रेस व त्यांचे सहयोगी पक्ष निवडून येतील. त्याचप्रमाणे पाच राज्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्याच पक्षाचा धबधबा राहील याबद्दल मुळीच शंका नाही.
पाच राज्याची निवडणूक ही जनतेने हातात घेतली असून जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे आहे. त्याचप्रमाणे देशातील मीडियाने सुद्धा निरपेक्षपणाने काम केले पाहिजे. तसेच पाच राज्यात जनतेच्या समस्या काय आहेत त्याचे वास्तव जनतेला सांगितले पाहिजे. तसेच प्रत्येक न्यूज वाहिन्यावर वेगवेगळे सर्वे आहेत त्यामध्ये मत मतांतर आहे. त्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही. फक्त एवढेच म्हणणे आहे की भाजपा विरोधात संपूर्ण देशात रोष आहे. व जनता त्यांना धडा शिकवून पाच राज्यात काँग्रेस व आमच्या सर्व सहकारी पक्षांचे सरकार येईल. त्यामुळे पाच राज्य तो झाकी है अभी दिल्ली अभी बाकी है!
. तसेच शेतकऱ्यांचे विषयावर बोलताना आप्पा पुढे म्हणाले की स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांना न्याय काँग्रेस पक्षाने दिलेला आहे.
डॉ मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान असताना सर्वात मोठी कर्जमाफी केली. त्यामुळे आज छत्तीसगड ,राजस्थान मध्ये काँग्रेसचे सरकार आहे तेथेही शेतकऱ्यांचे जे निर्णय झाले. ते कुठल्याच पक्षाने घेतले नाहीत. त्यामुळे पाच राज्यातील शेतकरीही आमच्या पाठीमागे आहेत. तसेच काँग्रेसच्या काळात महिलांना, दलितांना संरक्षण व न्याय देण्याचे काम केले. मात्र भाजप च्या सरकारमध्ये त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही. असेही ते शेवटी म्हणाले.