ऊस उत्पादकांसाठी पहिली उचल २८२५ रुपये तर अंतिम दर सर्वाधिक देणार : पालकमंत्री डॉ तानाजी सावंत
स्पर्धेत उतरण्यासाठी सर्वांना आवाहन
ढोकी :(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) ऊस उत्पादकासाठी आमची पहिली उचल २८२५रुपये तर सर्वांपेक्षा २१ रुपये अधिक देणार. व एका तपानंतर सुरू झालेला तेरणा साखर कारखाना याला संजीवनी देण्याचे काम सर्वांचे सहकार्यामुळे होत आहे. तसेच बारा वर्ष बंद असलेला कारखाना आज चालू झाल्यामुळे या ठिकाणी आज उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले. ते भैरवनाथ शुगर संचलित युनिट ०६ संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पूजनाच्या कार्यक्रमात केले. व्यासपीठावर भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत, माजी खासदार रवींद्र गायकवाड,
ह .भ .प प्रकाश महाराज बोधले, दत्ताअण्णा साळुंके, सुरज महाराज साळुंखे, धनंजय सावंत, कार्यकारी संचालक केशव उर्फ विक्रम सावंत, ढोकीचे उपसरपंच अमोल पापा समुद्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की, बारा वर्षाच्या तपानंतर तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू झाला. भैरवनाथ शुगर यांनी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतला. अखेर १४ नोव्हेंबर दीपावली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या कारखान्याची मोळी पडली. व सभासदांना न्याय मिळाला. त्यामुळे बोलताना
पालकमंत्री डॉ तानाजी सावंत पुढे म्हणाले की, भैरवनाथ शुगर सुरू करताना आम्हाला परिश्रमाची पराकाष्टा करावी लागली तेव्हा तो उभा राहिला. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही साखर कारखानदारी वर अवलंबून असते. आज परंडा येथील साखर कारखान्यामुळे तेथील आर्थिक प्रगती झालेली आहे. तेव्हा महाराष्ट्रातील प्रथम सुरू झालेले चार सहकारापैकी एक साखर कारखाना असलेला तेरणा हा बंद असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांची फार मोठी अडचण झाली होती. तेव्हा माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. म्हणूनच तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना घेण्याचा निर्णय घेतला. हा कारखाना बंद करण्यासाठी तेथे राजकारण आले. व शेतकऱ्यांच्या चुलीत विस्तव टाकण्याचे काम तेथे झाले. मात्र आम्ही शेतकऱ्यांसाठी कार्य करणार आहोत.तेव्हा शेतकरी केंद्रबिंदू मानून आम्ही काम करणार आहोत. एक सहकाराचा युनिट बंद पडले तर किती नुकसान होते. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेत हजारो ते लाखो लोकांचे ठेवी आहेत. तेथेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आम्ही जेव्हा तेरणा घेण्याचे ठरवले तेव्हा पहिले तीन वेळेस निविदा कोणीच भरली नाही .चौथे वेळेस आमचे एकच निविदा आली व पाचव्या वेळेस आमची निविदा अंतिम झाली.
तसेच हा कारखाना सुरू करण्यामागे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकारानेच शक्य झाले. बऱ्याच अडचणी आल्या मात्र अखेर तेरणा सुरू झाला याचे मला समाधान आहे असेही ते म्हणाले,
त्याचप्रमाणे उसाच्या दराबाबतीत बोलताना सुद्धा आमचा पहिला दर २८२५रुपये राहील व अंतिम दर सर्वांपेक्षा अधिक २१ रुपये राहील, तेव्हा ज्याला कुणाला स्पर्धा करायची आहे ते स्पर्धा करू शकतात. कारण आम्हाला शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती करायची आहे असेही ते शेवटी म्हणाले.
तत्पूर्वी माजी खासदार रवींद्र गायकवाड पुढे म्हणाले की शेतकऱ्याची प्रामाणिक राहणे व कारखाना चालवणे म्हणजे शेतकऱ्यांना न्याय देणे होय.
त्यानंतर ह .भ. प प्रकाश महाराज बोधले म्हणाले की,
डॉ.सावंत यांच्या रूपाने कारखान्याला एक परिस मिळालेले आहेत. ते वाकवचे असल्यामुळे सर्वांनी त्यांच्यासमोर वाकावेच लागते. कारण त्यांचे कार्य हे महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे सभासदांनी ऊस देऊन कारखान्याला संजीवनी देण्याचे काम करावे असेही ते म्हणाले.
तसेच प्रस्ताविक करताना चेअरमन
प्रा.शिवाजीराव सावंत पुढे म्हणाले की, ५५ हजार उसाचे एकर ची नोंद आलेली आहे. तेव्हा आपण कारखाना सुव्यवस्थित चालवू शकतो. व कारखान्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणार आहोत. त्यासाठी पांडुरंगाच्या आशीर्वादाने व संत गोरोबाकाकाच्या पुण्याईने आपण हा कारखाना घेतला आहे.
असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले. तर आभार अनिल खोचरे यांनी मांनले.
त्यावेळी तेथील कारखान्याचे कामगार उपस्थित होते.
वर्क्स मॅनेजर प्रमोद देशमुख,
मुख्य शेतकी अधिकारी श्री शितोळे,
चीफ इंजिनिअर अविनाश पवार ,
सी डीस्टीलरी मॅनेजर विठ्ठल शिरसट,
डीस्टीलरी मॅनेजर अरुण पाटील ,
चीफ अकाउंट पंडित
बिराजदार,
चीफ केमिस्ट सुंदर आव्हाड,
ऊस पुरवठा अधिकारी मच्छिंद्र पुंड,
सुरक्षा अधिकारी राजाभाऊ लाड, उपसुरक्षा अधिकारी सुनील लंगडे, परिसरातील सर्व शेतकरी, हितचिंतक व नागरिक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते.