>

अग्रीम विमा वितरण्यास सुरुवात :आ.राणाजगजीतसिंह पाटील


 अग्रीम विमा वितरणास सुरुवात

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रुपये 161 कोटी 80 लक्ष

- आ. राणाजगजितसिंह पाटील


धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)


पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी अग्रीम पीक विमा रक्कम वितरणास सुरुवात झाली असून या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये 161 कोटी 80 लक्ष वितरित करण्यात येत आहेत. 

पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 40 महसूल मंडळाला अग्रीम पिक विमा वितरित करण्यात येत आहे.  झालेल्या नुकसानीची पोटी शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास 5000 रुपये वितरित करण्यात होत आहेत.

धाराशिव तालुक्यात 48 कोटी 59 लक्ष, तुळजापूर तालुक्यात 40 कोटी 87 लक्ष, कळंब तालुक्यात 17 कोटी 13 लक्ष, भूम तालुक्यात 4 कोटी 16 लक्ष,  लोहारा तालुक्यात 16 कोटी 39 लक्ष, परंडा तालुक्यात 4 कोटी 7 लक्ष, उमरगा तालुक्यात 25 कोटी 53 लक्ष, वाशी तालुक्यात 7 कोटी 3 लक्ष असे एकूण 161 कोटी 80 लक्ष रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत.


अग्रीम नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. राज्य सरकारने देखील विमा कंपन्यांना त्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिळत असलेल्या रकमेमुळे शेतकऱ्यांना नक्कीच काहीसा दिलासा मिळणार आहे.


चौकट :- तसेच उर्वरित 17 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना देखील दिवाळी पूर्वी अग्रीम मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post