श्रीलंकेचा धुव्वा उडवीत भारताची उपांत्य फेरीत धडक...
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
श्रीलंकेचा धुव्वा उडवीत भारताने उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. आजचा दिवस भारताच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजाने अक्षरशः श्रीलंकेला सळो कि पळो करून सोडले. त्यामुळे आजचा दिवस भारताचा होता असं म्हणण्यापेक्षा प्रत्येक दिवस भारताचा भारतामध्ये होतो. भारतीय संघाने सलग सातवा विजय संपादन करून जगाला दाखविलेले आहे.
भारत श्रीलंका हा भारताचा सातवा सामना होता. श्रीलंका अशी एक संघ आहे की त्यांनी १९९२ च्या विश्वचषकात भारताचा काही कारणामुळे तांत्रिक पराभव झाला. त्यात श्रीलंकेची साधले. मात्र वारंवार साधत नसते.
आशिया चषकात भारताने श्रीलंकेला अवघ्या पन्नास धावाच्या आतच गुंडाळले होते. त्याचीच पुनरावृत्ती विश्वचषकात झाली. भारताच्या ३५८ धावांचे लक्ष श्रीलंका पेलू शकली नाही. प्रथम भारताने फलंदाजी करताना. रोहित शर्मा चार धावांवर बाद झाला. मात्र पुन्हा विराट कोहली व शुभमन गिल या जोडीने कमालच केली. शुभमन गिल ९२ वर बाद झाला. त्यानंतर भारताची स्थिती १९३ वर २ बाद अशी झाली. त्यानंतर श्रेयस अय्यर कोहलीला सुरेख साथ देत ५५ चेंडूत मध्ये ८२ धावा काढल्या. तर विराट कोहलीने ९४ चेंडूत मध्ये ८८ धावा काढल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा, के . राहुल. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांनी कमी जास्त धावांचे योगदान दिले. भारताला तब्बल आठ विकेट गमवावे लागले. त्यात मधुशंकाने सर्वाधिक ५ बळी घेतले.
त्यानंतर खेळण्यास आली ती श्रीलंका पहिल्या शतकाचा पहिला बॉल वर जसप्रीतने यष्टीचीत चे अपील पंचाकड केले. व पंचांनी बाद ठरविले . दुसरे षटक घेऊन आला तो मोहम्मद सिराज होय. त्यांनी सुद्धा करूणा रत्ने यष्टिचित केले. तेव्हा श्रीलंका संघाची घसरती मालिका सुरू झाली. किंवा श्रीलंकेच्या धावाची संख्या होती २ धावा,२ गडी बाद. त्यानंतर सिराज ने श्रीलंकेचा कर्णधार कुशल मेंडींसचा त्रिफळा उडविला. तो सुद्धा एक धावावर बाद झाला. त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवर समोर विक्रमाला सुद्धा सिराजने आउट केले.
त्यानंतर मोहम्मद शमी यांनी सुद्धा कमाल केली. त्यांनी असलंकां, अंगलो मॅथ्यूज, हेमंता, चमीरा, रजिथा, यांना स्वस्तात बाद केले. त्यानंतर शेवटचा बळी रवींद्र जडेजा यांनी घेतला. रजिथा तिक्षणा , मॅथ्यूज हे तीनच गडी दोन अंकी संख्या काढू शकले. केवळ ५५ धावावर श्रीलंकेचा संघ तंबूत परतला. आता भारत केवळ विश्वचषकापासून पाच सामने दूर असल्याचे दिसत आहे. आज लंका दहन करून भारताने हे सिद्ध केले की है दुश्मन जमाना गम नही हम किसीसे कम नही.