२०१९ च्या उपांत्य फेरीचा बदला उपांत्य फेरीने व्याजासकट परत केला.
भारताचा न्युझीलंड वर ७० धावांनी विजय
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
२०१९ चा बदला भारताने व्याजासह न्यूझीलंडला परत केला. व भारताने दणदणीत विजय मिळवत न्युझीलंड ला आसमान दाखविले. न्यूझीलंड संघाला वाटत होते की ,विश्वचषकावर आपली मोहर लागली आहे.मात्र त्यांचे विश्वचषकाच्या अगदी जवळ येऊन स्वप्न सलग दुसऱ्यांदा भंगले म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
न्यूझीलंड संघाने विश्वचषकात बऱ्याच प्रमाणात भारताचा पराभव केला होता. मला तो अजूनही सामना आठवतो त्यावेळी भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होते .त्यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना २३० धावाचे आव्हान न्यूझीलंड संघाला दिले होते. मात्र न्युझीलँड संघाने सहज पूर्ण करून भारताचा बरेच वेळेस पराभव केला होता. मात्र गेल्या दहा वर्षातील भारतीय संघ विश्वचषकाच्या जवळजवळ येत होता बाहेर जात होता. त्याचीच उजळणी यावेळेस होईल अशी न्यूझीलंड संघाला वाटत होते मात्र परिस्थिती वेगळीच झाली व न्यूझीलंड संघाला बाहेर पडावे लागले. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३९८ धावाचे आव्हान दिले होते. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी सुरुवात चांगली केली होती. मात्र संघाची धावसंख्या ७१ व रोहित शर्मा ४७ धावावर असताना चुकीच्या चेंडूवर फटका मारताना तो झेलबाद झाला. मात्र त्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी आला. सुंदर फटके मारायला सुरुवात केली मात्र शुभमन गिल दुखापतीमुळे तो परत गेला. व त्याच्या जागेवर श्रेयस अय्यर आला. तो जनू गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरला. त्याची सुरुवात संथगतीने झाली मात्र हळूहळू त्याने आपला रंग दाखवायला सुरुवात केली. विराट कोहली चे शतक झाले मात्र श्रेयस अय्यर शतक हे लाजवाब होते. विराट कोहली ने सचिन तेंडुलकरच्या शतकाच्या बरोबरीने एक शतक जास्त केले. त्याबद्दल त्याचे अभिनंदन. विराट कोहलीने ११३चेंडूत ११७ धावा काढल्या त्यात ९ चौकाराचा व २ षटकारांचा समावेश आहे.मात्र खरे शतक केले ते श्रेयस अय्यर यांनी होय. ७० चेंडू १०५ धावा श्रेयस अय्यर काढल्या. त्यांच्या ४ चौकार व ८ षटकार मारले. शुभमंगल यांनी ६६ चेंडू ८८ धावा काढल्या. त्यात ८ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे. नंतर गिल खेळायला आल्यानंतर आपल्या धावसंख्येत भर पडली. त्यानंतर सूर्यकुमार यादव काय कमाल करू शकला नाही .मात्र राहुलच्या निर्णायक धावा. ह्या विजय साठी पात्र ठरल्या असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण २० चेंडू ३९ धावा त्यात ५ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. अशाच काही निर्णायक धावावर भारताचा विजय झाला. व भारत चार- ३९७ धावा करू शकला.
न्युझीलंड संघ फलंदाजीसाठी आला. मात्र पाच षटक ३० धावा अशी न्युझीलंड स्थिती होती. मात्र सहावे षपक मोहम्मद शमी घेऊन आला व न्यूझीलंड संघाला पहिला झटका दिला. व असे करत करत दुसरा खेळाडू देखील शमीनी बाद केला. परंतु पुन्हा विल्यम्सन व मिचेलच्या जोडीने कमालच केली. ३९ धावा २ बाद अशी परिस्थिती होऊन. त्यांनी सुरुवातीला दोन तीन षटक हळू खेळली. मात्र त्यांनी पुन्हा खेळ दाखवायला सुरुवात केली. विल्यम्सन चौकार मारला तर मिचेल षटकार मारत होता. व भारतीय गोलंदाजांना त्यांनी परेशान करून सोडले होते. मात्र पुन्हा मोहम्मद शमीने कमाल केली. व न्यूझीलंड संघाचे दोन खेळाडू तंबूत पाठवीले. त्यानंतर २२० वर तिसरा व चौथा खेळाडू बाद झाला. तेव्हा न्यूझीलंड संघाला चाप बसण्यास सुरुवात झाली. व घसरगुंडी सुरू झाली. पाचवा खेळाडू २८० धावा असताना बाद झाला. फिलिप्स व मिचेल हे टिकून होते. मिचेल ने तर ११९ चेंडू१३४ धावा काढल्या. त्यात तब्बल ९ चौकार व ७ षटकार आहेत. रवींद्र हा काही कमाल करू शकला नाही. तर बाकी संघ सुद्धा काही करू शकला नाही. धावाचा डोंगर होता
मात्र त्याचा पाठलाग न्युझीलंड संघ करू शकला नाही. त्याला मोहम्मद शमीने अक्षरशः न्यूझीलंड गोलंदाजाची दानादान उडविली. शमीने ७ गडी बाद करून २०२३ विश्वचषकात पहिला गोलंदाज होण्याचा मान मिळविला. त्यामुळे मोहम्मद शमीने कमाल कर दिया. व न्युझीलंड को कंगाल कर दिया. असे चित्र दिसत आहे. त्यात रवींद्र जडेजा वगळता कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, व जसप्रीत बुमराह ला एक एक गडी बाद करता आले. मात्र मोहम्मद शमीने आज दिवस गाजविला. व भारताला खरोखर विजय मोहम्मद शमी चा वाटा असल्याचे दिसून येत आहे. न्युझीलंड संघ सर्व बाद ३२७ धावा असे चित्र आहे. सामना भारताने ७० धावाने खिशात घातला. व भारत आता अंतिम सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाची वाट बघत आहे. मोहम्मद शमीने ५७ धावा देऊन सात बळी घेतले. त्यामुळे आज संपूर्ण भारतात विजयाचे शिल्पकार म्हणून विराट कोहली श्रेयस अय्यर, व मोहम्मद शमी यांचा वाटा मुख्य होता. सर्वांनी चांगला खेळ केला हे सुद्धा तितकेच सांगणे आहे. २०१९ रोजी भारत जेव्हा उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. केव्हा न्युझीलंड ने असा काय विजय जल्लोष केला होता की, आपणच सदैव जिंकणार मात्र तसे होत नसते. आज श्रेयस ने मिचेल चे अभिनंदन केले. ज्यावेळी तो बाद झाला होता. एवढा प्रामाणिकपणा श्रेयस मध्ये आहे. व मोठेपणाही आपल्या भारतात आहे. त्याचा आदर्श न्युझीलंड संघाने घ्यावा. हे मात्र नक्की होय.