जनजागृतीच्या माध्यमातून अटल भूजल योजनेत महिलांचा सक्रिय सहभाग : डॉ. सचिन ओंम्बासे
प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
अटल भूजल योजनेअंतर्गत *माहिती शिक्षण व संवाद समूह संघटन आणि महिलांना योजनेच्या मुख्य प्रवाहात आणणे"* या विषयावर एक दिवसीय जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन माननीय डॉ.श्री सचिन ओम्बासे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष अटल भूजल योजना जिल्हास्तरीय नियोजन समन्वय समिती धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
आजच्या या प्रशिक्षणाचे प्रमुख पाहुणे श्री रविंद्र माने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी आधारित योजना व लाभाचे स्वरूप तसेच पाणी बचतीच्या उपाययोजनांची माहिती दिली तर मा.जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे साहेब यांनी संलग्न विभागातील प्रशासकीय अधिकारी यांच्या अभिसरणाबाबत चर्चा केली व मागणी व पुरवठा आधारित उपाययोजना बाबत निधी व कामे याबाबत विभाग प्रमुख यांना जलसुरक्षा आराखड्यातील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असे सांगितले. तसेच अटल भूजल योजनेची सद्यस्थिती व पुढील 2023 व 24 या आर्थिक वर्षाचे नियोजन डॉ श्रीमती मेघा एस शिंदे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी सांगितले तर जल व भूमी व्यवस्थापन डॉ. नितीन पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उप परिसर धाराशिव, श्री आर व्ही जोगदंड कार्यकारी अभियंता महावितरण धाराशिव, श्री काकडे साहेब जिल्हा मृद व जलसंधारण विभाग , श्री टीपी हनुमते शाखा अभियंता लपा जि प, श्री गणेश चादरे सर टाटा इन्स्टिट्यूट तुळजापूर, श्रीमती प्रिया राखुडे एस एस पी सामाजिक संस्था, श्री देविदास पवार यशदा ट्रेनर, श्री सचिन सूर्यवंशी ज्ञान प्रबोधनी हराळी, श्री ब्रह्मदेव माने डी पी एम यु अटल भूजल योजना यांनी मार्गदर्शन केले.या प्रशिक्षणासाठी संलग्न विभागातील संबंधित अधिकारी सरपंच ग्रामसेवक कृषी सहाय्यक भूजल मित्र बचत गटातील महिला यांची एकूण 140 जणांची उपस्थिती होती या प्रशिक्षणा करिता जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्था यांनी प्रयत्न केले तर यावेळी श्री ब्रह्मदेव माने जिल्हा माहिती शिक्षण व संवाद तज्ञ यांनी सूत्रसंचालन केले व आभार डॉ मेघा एस शिंदे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी मानले