पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते तेरणाचे मोळी पूजन दीपावली पाडव्या दिवशी....ढोकी :(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचे हस्ते तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम १४ नोव्हेंबर गुढीपाडवा या दिवशी होणार आहे. त्यामुळे तब्बल १२ वर्षानंतर तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात मोळी पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेले आहे. ढोकी व त्याचा परिसर असलेला आज वातावरण प्रसन्न होत आहे. भैरवनाथ शुगर संचलित युनिट ०६ मार्फत तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना पंचवीस वर्षाच्या भाडे तत्त्वावर घेतलेला आहे. त्या अनुषंगाने केवळ नऊ महिन्यात कारखान्याची उभारणी करून इतिहास निर्माण केला. एक दैदिप्यमान पराक्रम निर्माण झालेला आहे. १४नोव्हेंबर २०२३ रोजी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू होत आहे. त्यात महत्त्वाचा मुद्दा राहणार म्हणजे ऊस दर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे लातूर ,धाराशिव ,कळंब या तीन तालुक्यातील तब्बल १६७ गावांचा यात समावेश आहे. तसेच परिसराला ग्रीन पट्टा म्हणून ओळखले जायचे. मात्र यावर्षी अपुरा पाऊस उसाच्या उत्पादनात घट यामुळे शेतकऱ्यांना कमी उसाचे उत्पादन निघणार आहे. तसेच बारा वर्षानंतर तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू होणार त्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झालेल्या असून त्याचा सर्वांना फायदा होणार आहे. व धाराशिव जिल्ह्याच्या महसुलात देखील त्यामध्ये वाढ होणार आहे हे मात्र नक्की होय. तेव्हा दीपावलीच्या गुढीपाडव्यानिमित्त कारखाना सुरू होणे हे म्हणजे महत्त्वाचा क्षण आहे. तसेच डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाने एक चिरंतन विकासाचा गाडा धाराशिव जिल्ह्यात आणला आहे. त्यामुळे तेरणा शेतकरी साखर कारखाना सुरू झाल्यामुळे बऱ्याच प्रमाणात बाजारपेठ फुलून येणार असून एक विकासाचे मॉडेल पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात होत आहे त्याला आपण शुभेच्छा देऊया.
पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते तेरणाचे मोळी पूजन दिपावली पाडव्या दिवशी
byshrikrishna lomte
-
0