>

अटल भूजल योजनेतून जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न




अटल भूजल योजनेतून जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न 

सरपंच, ग्रामसेवक ,भूजल मित्र यांचा भरघोस  प्रतिसाद 

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
अटल भूजल योजनेतील समाविष्ट 48 गावापैकी अटल भूजल योजनेत काम करणारे सरपंच ग्रामसेवक भूजल मित्र शेतकरी उत्पादक गट प्रगतशील शेतकरी यांच्यासाठी एक दिवशीय जिल्हास्तरीय माहिती शिक्षण संवाद या घटकांतर्गत आयसी कार्यशाळा ठेवण्यात आली होती. या कार्यशाळेत मा.श्री.राहुल गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहअध्यक्ष अटल भूजल योजना, यांनी ऑनलाइन व्हीसीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले तर सदरची कार्यशाळा श्रीमती प्रांजल शिंदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय कृषी महाविद्यालय किणी या ठिकाणी घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये अटल भूजल योजनेचे उद्देश, योजनेतील कामाचे टप्पे, सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठीची साधने, इत्यादी बाबत विहीर विंधन/ विहीर मालक, शेतकरी उत्पादक गटाचे सदस्य यांना प्रोत्साहित करण्यासाठी व ग्रामस्थांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासकीय संलग्न विभागाच्या योजनांचे समन्वय बाबत मार्गदर्शन करण्यात आले, पिक फेर बद्दल, पाणी बचतीच्या उपाययोजना, कमी पाण्यात वर आधारित पीक संरचना व सुधारित बी बियाण्यांचे वाण आणि पिकांचे व्यवस्थापन, जल व भूमी व्यवस्थापन, नैसर्गिक आच्छादन, कर्ब वाढीसाठी व पाणी बचतीच्या उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण उपचार, अभिसरण संकल्पना, संलग्न विभागातील कामांची सद्यस्थिती, कार्यशाळेचा महत्त्वाचा घटक असलेला माहिती शिक्षण संवादाचे महत्त्व, शेडनेट, ग्रीन हाऊस,याबाबत देखील माहिती या कार्यशाळेमध्ये देण्यात आली. विविध पद्धतीने माहिती शिक्षण संवाद या घटकांतर्गत प्रचार व प्रसिद्धी जनजागृती केली जाते याबाबतची माहिती प्रशिक्षणार्थींना देण्यात आली. यावेळी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. श्रीमती मेघा एस शिंदे यांनी माहिती दिली तर यामध्ये प्राचार्य डॉ.एम बी पाटील सहयोगी अधिष्ठाता शासकीय कृषी महाविद्यालय किणी, प्राध्यापक डॉ. नितीन पाटील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उप परिसर धाराशिव, श्री गणेश चादरे टाटा सामाजिक इन्स्टिट्यूट तुळजापूर, श्री आर आर चोबे सामाजिक वनीकरण विभाग,श्री आर पिंपळे विभागीय जलसंधारण अधिकारी लपा जि प,श्री बी ए चौगले वनविभाग,तसेच श्री बालाजी पवार प्रगतशील शेतकरी पाडोळी, यांनी मार्गदर्शन केले तर प्रा किरण थोरात कृषी महाविद्यालय, विविध संलग्न भागाचे अधिकारी तथा कर्मचारी तसेच प्रगतशील शेतकरी, भूजलमित्र, ग्रामसेवक,सरपंच, विहीर मालक,शेतकरी उत्पादक गटाचे सदस्य, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील तज्ञ व शासकीय कृषी महाविद्यालय किणी येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी श्री ब्रह्मदेव माने जिल्हा माहिती शिक्षण संवाद तज्ञ यांनी मार्गदर्शन व  सूत्रसंचालन केले तर आभार श्रीमती डॉ. मेघा शिंदे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post