सर्वांच्या सहकार्यामुळेच व पाच वर्षाच्या महाविद्यालयीन मूल्यांकनामुळेच नॅक चे यश : डॉ.
सुनील पवार
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास बी ++ ग्रेड.
कळंब (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) सर्वांच्या सहकार्यामुळेच व पाच वर्षाच्या महाविद्यालयीन मूल्यांकनामुळेच नॅक चे यश घडवून आले. त्यामुळेच आमच्या महाविद्यालयाला बी ++ हा ग्रेटसह २.७७ गुण मिळाले व तृतीय सायकल मध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय ही श्रेणी प्राप्त केली आहे .
सविस्तर वृत्त असे की, कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय हे कळंब तालुक्याची शान आहे . तसेच म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्याची शान आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर हे नाव नसून सर्वसामान्यांना न्याय देणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण शिक्षण क्षेत्रात, बँकिंग क्षेत्रात, व उद्योग क्षेत्रात देखील आज मोहेकरांचा धबधबा आहे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य अतुलनीय आहे. त्याचेच औचित्य साधून आपण शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय चे मनमिळावू प्राचार्य डॉ सुनील पवार हे आहेत.
त्यांचा माझा कुठलाही परिचय नसताना त्यांनी मला मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच प्राचार्य डॉ. सुनील पवार पुढे म्हणाले की, देशातील सर्व महाविद्यालय सर्व विद्यापीठे यांना नॅक हे करावेच लागते. दर पाच वर्षांनी ते होत असते. महाविद्यालयीन प्रत्येक वर्षी जे महाविद्यालयात उपक्रम राबविले जातात. त्याचा लेखाजोखा , तसेच विद्यार्थी संख्या, महाविद्यालयीन निकाल, महाविद्यालयाच्या प्रत्येक विभागाने घेतलेले कार्यक्रम, तसेच विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, याची संपूर्ण माहिती एकत्रित पाच वर्षांनी नॅक समितीला पाठवावी लागते. ती ऑनलाईन होय. त्यामध्ये ऑनलाईन ७०% टक्के व ऑफलाइन ३०% मूल्यांकन असते.
येणारी समिती तीस टक्के निकष लावत असते. त्यात गावातील नागरिक ,शेतकरी यांची प्रतिक्रिया घेत असते. तसेच विद्यार्थ्यांचे मुलाखती, प्राध्यापकांच्या मुलाखती, त्याचप्रमाणे महाविद्यालय जेवढे विभाग आहेत त्यांची सुद्धा ती कसून चौकशी करत असते. जे कार्य आपण पाच वर्षात केले त्याचे दोन दिवसात मूल्यांकन होत असते. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषद (नॅक) बेंगलोर त्यात तीन सदस्यांची टीम असते. त्याचप्रमाणे बाहेर राज्यातील विद्यापीठाचे कुलगुरू असतात, तसेच एका विद्यापीठातील एक सदस्य, तसेच बाहेर राज्यातील एक प्राचार्य असतात. ती समिती मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन समिती असते. दोन दिवसात ते समिती अत्यंत प्रत्येक बाबीचा सखोल विचार करून मूल्यांकन करत असते.
त्याच्यानंतर आठ ते पंधरा दिवसानंतर समिती आपला अहवाल नॅकला कळविते. व त्यानंतर निर्णय होतो. आणि तो झाला व आम्हाला बी प्लस प्लस हा ग्रेट मिळाला. तसेच या ग्रेड मागे आमचे माजी विद्यार्थी, जे काही नोकरी लागलेली सुद्धा विद्यार्थी यांचे सुद्धा श्रेय आहे, तसेच आमच्या मागे आमची संस्था खंबीरपणे उभी राहिली. यांचे सुद्धा श्रेय आहे. त्याचप्रमाणे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा सचिव आदरणीय डॉ. अशोकराव मोहेकर व संस्था संचालकाचे मोलांचे सहकार्य लाभले. तसेच शहरातील नागरिक ,शेतकरी, यांनी सुद्धा आम्हाला भरभरून साथ दिली, तसेच आमच्या महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, यांचे श्रेय आहे.
प्रथम आमच्या महाविद्यालयाची नॅक मूल्यांकन व पुन:मूल्यांकन तपासणी २००४ रोजी झाले. त्यावेळी बी ग्रेड मिळाला, त्यानंतर २०१६ रोजी बी ग्रेड, व आता २०२३ रोजी बी प्लस प्लस मिळाला. व आता २०२८-२९ साठी तयारी सुरू झालेली आहे .त्यानंतर आम्ही सर्वात चांगला ग्रेड मिळू हा आम्हाला विश्वास आहे.