भारताने इंग्लंडला आसमान दाखवले ...
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) भारताने इंग्लंडला आसमान दाखवीत विजयाचा सहावा सामना जिंकून अंकतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे. भारताने नऊ पैकी सहा सामने आपल्या खिशात घातलेले आहेत.
२०११ भारत इंग्लंड सामना बरोबरीत सुटला होता. २०१५ व २०१९ च्या विश्वचषकात इंग्लंडने भारताला हरवले होते. इंग्लंड हा संघ चांगला खेळतो चांगला आहे. मात्र घमंड हा त्यांच्यात आहे. आज भारताने इंग्लंडला तब्बल १००धावांनी हरविले. मात्र भारताने तो विजय संयमाने घेतला. गेल्या वर्षी वीस षटकांच्या विश्वचषकात इंग्लंडने भारताला हरवले होते. तो आज फलंदाज मान खाली घालून बसला होता. तेव्हा हसत हसत षटकार मारणारा तो इंग्लंड फलंदाज आज का रडत होता देव जाने. असो त्या खोल विषयात जायचे नाही मात्र सर्वांना माहीत असावे ही गोष्ट आहे. इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजी दिली. प्रथम भारताने फलंदाजी करताना. सुरुवातीला ४० गावात भारताचे ३ फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर रोहित शर्मा ,के. राहुल संघाला सावरण्याचा प्रयत्न केला .मात्र मात्र डाव काय सावरत नव्हता त्यातच राहुल बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि प्रयत्न केला मात्र जडेजा सुद्धा बाद झाला. दिग्गज खेळाडू विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, हे स्वस्तात गेले. त्यानंतर रोहित शर्माने ८७ धावा काढून इंग्लंड संघाला चोख प्रतिउत्तर दिले. त्यातच कमाल केली ती सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह यांनी होय. सूर्यकुमार यादवने ४९ धावा प्रतिकूल परिस्थितीत केल्या. व जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव ने तर कमालच केली. इंग्लंडच्या गोलंदाजांना शेवटपर्यंत आसमान दाखवले. इंग्लंडचे गोलंदाज वारंवार त्यांच्यावर दबाव आणत होते मात्र कुलदीप यादव ने ९धावा काढल्या , तर जसप्रीत बुमराने १६ धावा काढल्या. जो खेळ मोहम्मद सेमी बाद झाल्यानंतर १८७ वर वर ७ बाद अशी परिस्थिती होती. ते जसप्रीत व कुलदीप ने पन्नासाव्या षटकापर्यंत पर्यंत घेऊन गेले. व या दोघांना इंग्लंड संघाने किती त्रास दिला मात्र त्यांनी त्याचा सामना करत पन्नासाव्या शतकाच्या शेवटच्या बॉलवर धाव घेत असताना जसप्रीत धावबाद झाला. तेव्हा भारताने २२९ धावांचे सोपे लक्ष इंग्लंड संघाला दिले होते. त्या दोघांच्या भागीदारीमुळे आपणही शेवटपर्यंत खेळू शकतो असा विश्वासही त्यांना आला.
त्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजी करण्यास आला. चार षटकात ३० धावा अशी मजबूत त्यांचे धावसंख्या होती. त्यानंतर पाचवे षटक बुमराह असे घेऊन आला की पाचव्या शतकाच्या पाचव्या बॉलवर मालन हा त्रिफळाचीत झाला तर रूट हा पायचित झाला. तेव्हापासून इंग्लंड संघाची घसरगुंडी सुरू झाली. ती शंभर धावा सर्व बाद अशी परिस्थिती झाली. त्यानंतर मोहम्मद शमी ने बेन स्टोक्स त्रिफळा उडवून पुन्हा इंग्लंड संघाला खिंडार पाडले. त्यानंतर लगेच बरिस्टो हा त्रिफळाचीत झाला. त्यानंतर इंग्लंडची दयनीय परिस्थिती पुन्हा सावरली नाही. त्यानंतर कुलदीप यादव २ गडी बात केले, रवींद्र जडेजा १ गडी बात केला. तेव्हा मोहम्मद शमीने ४ तर जसप्रीत बुमराह ३ गडी बाद केले. इंग्लंड संघाचा कर्णधार बटलर हा जेव्हा मोहम्मद शमी बाद झाला होता. तेव्हा पंचांकडे बोट दाखवीन फेर निर्णय याचा याचे ढोंग करत होता . मात्र त्याला माहीत नव्हते की आपण हरणार आहोत. व हरून आपण इंग्लंडला जायच्या तयारीत आहोत. हार जीत होत असते मात्र संयम महत्त्वाचा असतो. जो संयम राहतो तोच भविष्यात आयुष्यात पुढे जातो. हे इंग्लंड संघांनी लक्षात ठेवावे. म्हणूनच त्यांची १०० धावांनी हार झाली हे त्याचेच उदाहरण आहे.