एकच मिशन मराठा आरक्षण ला मिळतोय प्रतिसाद...
ढोकी(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) एकच मिशन मराठा आरक्षण ला मिळतोय प्रतिसाद त्यामुळे धाराशिव तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषणाची जोरदार चर्चा आहे. ढोकी गावची आहे.
सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाला ४० दिवसाचा आरक्षणाचा अल्टिमेटम दिला होता. महाराष्ट्र शासनाने वेळ काढूपणा केला. व अजून काही दिवसाची मागणी केली. मात्र ४० दिवसात झाले नाही, ते अजून किती दिवसात होणार यामुळे समस्त मराठा समाज नाराज झालेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांना गावबंदी झालेली आहे. चुलीत गेला पक्ष व चुलीत गेले राजकारण असे म्हणत मराठा समाजाने फक्त ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी कडक पावले उचलायला सुरुवात केलेली आहे. ते अहिंसेच्या मार्गाने सुरू आहे.
त्या अनुषंगाने ढोकी तालुका जिल्हा धाराशिव या गावात साखळी उपोषण सुरू केलेले आहे. ढोकी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साखळी उपोषणात प्रतिसाद मिळत आहे. त्या ठिकाणी आसपासच्या गावातील सर्व बांधव घेऊन पाठिंबा देत आहेत. तेव्हा आरक्षण मिळेपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे. तेव्हा कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. अशा अनुषंगाने त्या साखळी उपोषणात प्रभाकर गाढवे, संजय कवडे ,सौरभ देशमुख ,अरुण देशमुख, कुंदन समुद्रे, प्रमोद देशमुख, सतीश वाकुरे,आगतराव लोमटे ,पत्रकार सुरेश कदम, पत्रकार श्रीकृष्ण लोमटे उपस्थित होते .