मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद...
दोन दिवस झालं पाणीही नाही.
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा ) मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत असून गेल्या दोन दिवसापासून त्यांनी पाणी पिल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे. तेव्हा त्यांनी उपचार घेण्यासुद्धा नकार दिल्यामुळे महाराष्ट्र सरकारची धडधड वाढलेली आहे.
24 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाची डेडलाईन संपलेली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाला 40 दिवसाची मुदत संपल्यानंतर शासनाने कुठलाच निर्णय घेतलेला नाही. तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे हत्यार काढून अहिंसेचा मार्गाने उपोषण सुरू केलेले आहे. त्याला संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत आहे. धाराशिव तालुक्यात कोलेगाव, ढोकी, चिखली वाघोली, खेड , चिलवडी जागजी ,येडशी , सांजा
धाराशिव शहर, अशा ठिकाणी साखळी उपोषण धाराशिव तालुका येथे सुरू आहे. तेव्हा जर महाराष्ट्र शासनाने त्याची दखल नाही .तर त्याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील. तेव्हा आरक्षणाचा जीआर ताबडतोब काढून शासनाने मराठा समाजाला आरक्षणाचे प्रमाणपत्र देण्यास सुरु करावे. शिंदे समिती धाराशिव येथे येत आहे. मात्र एवढा विलंब कसा असा जनतेत चर्चा होत आहे. तेव्हा शासनाने ताबडतोब
त्याचा निर्णय घ्यावा. विलंब न करता व पुढील आत्महत्या टाळाव्यात. व मराठा समाजाला आरक्षण देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती आहे.
मराठा समाजातील नेते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन दिवसापासून पाणी व उपचारास नकार दिल्यामुळे शासनाची अडचण होणार आहे. शेवटी शासनाने ताबडतोब निर्णय घेऊन त्याला साथ द्यावी व उपोषण सोडावे अशी शासनाने विनंती करावी. आता महाराष्ट्र शासनाने कुठल्याही दबावला बळी न पडता आरक्षण द्यावे. मराठा समाजाला त्याचा हक्क द्यावा. आतापर्यंत शांततेत झालं ते भरपूर झालं आता अंत पाहू नये. शेवटी शासन आपल्या दारी येऊन योजना पूर्ण करावे. त्याचप्रमाणे आरक्षण आपल्या दारी महाराष्ट्र शासनाने योजना राबवावी होय.