>

अफगाणिस्तानने पाकिस्तानचा धुवा उडविला



 अफगाणिस्तानने पाकिस्तानचा धुवा उडविला ...  

           धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा ) अफगाणिस्तानने पाकिस्तानचा धुवा उडवीत अंक तालिकेत पाकिस्तानच्या पाकिस्तानची बरोबरी केली. विश्वचषकात आता तरी पाकिस्तान अफगाणिस्तानच्या वरील असला तरी अंकतालिकेत बरोबर असलेला दिसून येत आहे. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना २८२गावाचे लक्ष अफगाणिस्ताना समोर दिले. पाकिस्तानचे पहिल्या दहा षटकात ४६ रन काढून एक गडी गमवावा लागला होता. त्यानंतर अफगाणिस्तानच्या फिरकीपटू नूरने तीन खेळाडूंना बाद करीत पाकिस्तानना कात्रज चा घाट दाखवून दिला. पाकिस्तानी खेळाडू ची रणसंख्या वाढत होती मात्र त्यांची हळूहळू गडी बाद होत होते. नूरने तर जे फलंदाज चांगले खेळ खेळत आहेत अशा शफिक  व बाबर ला व मोहम्मद रिजवान यांना बाद केले. त्यामुळे पाकिस्तान संघाला हळूहळू घसरगुंडी सुरू झाली व खान व अहमद या जोडीने  पाकिस्तान संघाला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. परंतु खानच्या ३८व अहमद चाळीस दहावा हा निर्णय ठरल्या व पाकिस्तान २८२ धावा पर्यंत मजल मारू शकला. त्यानंतर अफगाणिस्तान संघ फलंदाजी करण्यास उतरला. गुरबाज व इब्राहिम या जोडीने तब्बल १३० भागीदारी केली. व पाकिस्तानी गोलंदाज  आफ्रिदी ते अहमद व अजून काही असो सर्वांची फलंदाजी अगदी फोडून काढली. इब्राहिम यांनी तर पाकिस्तानी गोलंदाजी गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. ते दोघे बाद झाल्यानंतर शहा व शाहिदि  यांनी खेळाचा शेवट केला. इब्राहिम या खेळाडूने ८७ धावा काढून आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणून दिले तर त्याला गुरबाज यांनी ६६ धावाने साथ दिली. त्यानंतर शहा यांनी ७७ धावा काढल्या तर शाहिरी यांनी ४८गावाकडून विजयाचा समारोप केला समोर.

     तत्पूर्वी अफगाणिस्तान अफगाणिस्तान संघाने १५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड संघाचा पराभव केला. केव्हा बऱ्याच जणांना वाटले वाटले की हा योगायोग असू शकतो. मात्र २३ ऑक्टोबर च्या  सामन्यातून विरोध करणाऱ्यांची तोंड बंद झाली. त्यात खरा विजयाचा शिल्पकार आहे हा अफगाणिस्तान संघाचा फलंदाजी प्रशिक्षक अजय जडेजा होय. इंग्लंड विरुद्ध च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने २८४ गावाचे लक्ष इंग्लंड संघाला दिले होते ते केवळ २१५ धावा करू शकले. तेव्हाही  गुरबाज यांनी ८० धावा केल्या होत्या . फलंदाज प्रशिक्षकामुळे फलंदाजी सुधारली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. योगायोग हा एकदा असतो तो हमेशा नसतो. सर जडेजा यांच्या नेतृत्वात हा संघ चालला तर हा भविष्यात हा संघ चांगली कामगिरी करू शकतो.

Post a Comment

Previous Post Next Post