न्युझीलँड ला हरवून भारताने घेतला बदला...
धाराशिव (सा. संत गोरोबाकाका समाचार वृत्तसेवा)
भारतात विश्वचषक 2023 चे धुमशान सुरू आहे. त्यात अनपेक्षित निकाल आपल्याला बघायला मिळत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. नेदरलँड सारख्या संघाने दिग्गज अशा दक्षिण आफ्रिकेला हरवून विश्वचषकात जोरदार केलेले हे सुद्धा आपल्याला सांगता येईल.
काल रविवार 22 ऑक्टोबर 2023 चा दिवस या दिवशी भारत न्यूझीलंड सामना होणार व या सामन्याकडे सर्व जगाचे लक्ष असणार हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. कारण 2019 च्या भारत न्यूझीलंड उपांत्य फेरीत भारताला चुकीमुळे पराभव पत्करावा लागलेला होता. तो पराभव आज 2023 ला साखळी सामन्यातच भारताने न्यूझीलंडला व्याजासहित परत केला यासारखे नामसकी न्युझीलँड वर कधीच आलेली नव्हती व येणार नाही. कसोटी विश्वचषकात भारताने दोनदा पराभव थोडक्यात झाला व 2015 व 2019 चा विश्वचषक सुद्धा थोडक्यात भारताने गमावला आता हा विश्वचषक भारत चांगल्या गुणतालिकेत येऊन जिंकेल हा देखील भारतातील 135 कोटी लोकांना त्याचा विश्वास आहे.
काल नाणेफेक जिंकून रोहित शर्मा ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला असे वाटले की 2019 सारखी गत आपली होती की काय कारण न्यूझीलंडचा मारा वाढत चालला होता त्यांचा भावाचा डोंगर मोठा होत होता व साधारण त्यांचे शंभर धावांची भागीदारी सुद्धा झाली होती. भारतीयवंशीय असलेल्या न्यूझीलंड संघाचा रवींद्र यांनी 75 धावा करत चांगली साथ दिली. मात्र पुन्हा अचानक पहिले दोन फलंदाज ९ व दुसरा फलंदाज १९ वर बाद झाला मात्र तिसरा फलंदाज १७८ बाद झाला तो म्हणजे रवींद्र होय. अशी परिस्थिती होती मात्र मोहम्मद शमी व कुलदीप यादव ने यादवने त्यांच्या गावात खोडा घातला व त्यांना दबावत आणण्याचा प्रयत्न केला.
मोहम्मद सिराजने देखील महत्त्वाचा फलंदाज आउट करून खऱ्या अर्थाने न्यूझीलंड संघाला घरघर लावली. जसप्रीत बुमराह ने आपल्या यार करणे न्यूझीलंड संघाला झुंजविले. व 48 व्या षटकात मोहम्मद शमींनी कमालच केली सलग दोन बॉलवर दोन त्रिफळाची करून न्यूझीलंड संघाला हादराच दिला. तेव्हा न्यूझीलंडचा संघ सर्व बाद 273 धावा करू शकला.
भारतीय संघ फलंदाजीला आल्यानंतर शुभम गिल व रोहित शर्मा ने चांगली सुरुवात केली मात्र एखाद्या चुकीच्या चेंडूला खेळताना रोहित शर्मा त्रिफळाचीच झाला. व त्यानंतर सर्व कमान विराट कोहलीने सांभाळली व 95 धावा चा मारा करून भारताला विजयाच्या जवळ घेऊन आला व भारताने हा सामना जिंकला. रोहित 46 धावा काढल्या त्यात सहा षटकार व साहब चौकार समावेश आहे. दोन बाद अशी परिस्थिती भारताची बेकार असताना सुद्धा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी
सावरला. न्युझीलँड चा गोलंदाज सेंटरचे बॉल स्विंग होत असताना सुद्धा विराट कोहलीने जास्तीत जास्त जागेवरून खेळून त्यास प्रत्युत्तर दिले तर बोल्ट ची फलंदाजी तर धुवूनच काढली . 2019 ला भारत जिंकल्यानंतर जल्लोष करणारा विल्यम्सन हा राखीव खेळाडू संघाने ठेवला होता. कारण त्याला हा पराभव पराभव पचवता आला नसता यामुळेच त्याला राखीव मध्ये ठेवले असेल हे मात्र नक्की होय. भारत सदैव जगजेता आहे राहील हे भारताने सिद्ध केलेले आहे.
विराट कोहलीने खरंच काल कमाल केली व अक्षरशः न्यूझीलंड संघाची धुलाई केली. भारत अंक तालिकेत आता एक नंबर वर आहे पाचपैकी पाच सामने शिवून दहा गुण घेऊन भारत उपांत्य फेरीत प्रवेश करील अशी इच्छा आहे . परत फक्त विश्व कप जिंकण्यापासून सहा ते सात सामने दूर आहे असे देखील म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
जेव्हा २०१९ ला न्यूझीलंड सोंग बऱ्याच वेळेस चुकीच्या पद्धतीने निर्णय घेऊन जिंकला हे देखील चर्चा होती मात्र आता त्यांचा नाविलाज आहे. त्यामुळे भारतच अजिंक्य राहणार हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.