तेरणेला गतवैभव प्राप्त करून देणार : चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत
तेरणेचा बॉयलर अग्निपदीपन सोहळा उत्साहात साजरा.
ढोकी (सा.संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
तेरणेला गतवैभव प्राप्त करून देणार तसेच यासाठी सर्वांचे सहकार्य असणे अपेक्षित आहे. आज बॉयलर अग्नी प्रदीपन झालेले आहे. व काही दिवसात उसाची मुळे टाकणार आहोत. तेव्हा साहेब येथील उसाचा भाव निश्चित करतील ,तेव्हा आम्ही काम करणारे आहोत. तेव्हा तुम्ही भावाचे चिंता करू नये ,साहेब चांगला निर्णय घेतील व सर्वांना न्याय देतील अशी माहिती चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांनी दिली.
सविस्तर वृत्त असे की असे की, भैरवनाथ शुगर युनिट क्रमांक ६ ने तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना कारखाना चालविण्यासाठी घेतला आहे. केवळ नऊ महिन्यात बारा वर्षे बंद असलेल्या कारखान्याची उभारणी करून भैरवनाथ परिवाराने एक महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण केलेला आहे.
२१ ऑक्टोबर शनिवार रोजी कार्यक्रमात प्रथम ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला. लिंबराज शितोळे व सावता माळी अशा ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करून सभासदांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा कारखाना म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो.
तसेच चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत बोलताना पुढे म्हणाले की, माणुसकी पेक्षा दुसरा पक्ष नाही. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या पक्षात असतात मात्र या कारखान्यांमध्ये येताना पक्ष बाजूला ठेवणे गरजेचे आहे. तेव्हा येथे फक्त शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. तेव्हा इथे पक्षपात केला जाणार नसून सर्वांना न्याय देणे हाच आमचा उद्देश आहे असेही ते म्हणाले . सहकारी साखर कारखाने हे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी असतात तेथील बाजारपेठ चांगली व्हावी सर्वांना न्याय मिळावा तेथील परिसराचा विकास व्हावा यासाठी असतात. मात्र स्वतःच्या साठी हे कारखाने नसतात. ज्यावेळी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर अडचण आली त्यावेळेस भैरवनाथ परिवाराने १२ कोटी रुपयांची मदत देखील केली होती याचा सुद्धा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
आपले काहीतरी ऋणानुबंध होते .त्यामुळे विठ्ठलाने संत गोरोबा काका यांनी आपली भेट घडवली.
तेव्हा आपण सर्वजण कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी व्यापारी व समाजातील सर्व घटकाचा विकास करूया व कारखाना हा यशस्वी रित्या सुरू करून सर्वांना न्याय देवू.
तसेच तत्पूर्वी सर्व मान्यवराचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ढोकीचे उपसरपंच अमोल पापा समुद्रे, संग्राम भैय्या देशमुख, निहाल काझी,ॲड अजित खोत, माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे, अजित पिंगळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
भैरवनाथ साखर समूहाचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत, व्हाईस चेअरमन अनिल सावंत, जिल्हा बँकेचे संचालक व कार्यकारी संचालक केशव सावंत , गिरीराज सावंत व ऋषीराज सावंत अशा मान्यवर मान्यवर हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन ची पूजा करण्यात आली .
त्यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, अनिल सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे, सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, तालुकाप्रमुख अजित लाकाळ उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व शेतकरी, सभासद, व्यापारी व्यापारी उपस्थित होते.