तेरणाचे प्रथमअग्नीप्रदीपन कार्यक्रम २१ ऑक्टोबरला..
तेहतीस हजार शेतकरी सभासदांचा विश्वास जिंकला
डॉ. तानाजी सावंत यांनी करून दाखविले...
ढोकी(सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
तेरणेची लक्ष्मी आज खऱ्या अर्थाने जागी झाली व शेतकरी सभासदांकडे लक्ष देऊ लागली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण शेतकऱ्यांना अच्छे दिन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत हे घेऊन आलेले आहेत. तब्बल 12 ते 13 वर्षानंतर भूतो न भविष्य अशी क्रांती प्रेरणा परिसरात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे.
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना यांचे प्रथम अग्नी प्रदीपन सोहळा २१ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केलेला आहे. तेरणा संघर्ष समिती यामध्ये सर्वपक्षीय नेते होते त्यांनी सुद्धा तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा असे प्रयत्न केले व त्याला परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन तो सुरू करण्यास आज थोडा तरी प्रतिसाद म्हणण्यापेक्षा 100% प्रतिसाद होऊन उद्या बॉयलर प्रदीपन पण चा कार्यक्रम होत आहे.
२ जानेवारी रोजी भैरवनाथ शुगर यांनी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेतला होता. एवढ्या कमी वेळात साखर कारखाना सुरू करणे हे काही साधी गोष्ट नाही पण ते त्यांनी शक्य केले हे देखील विसरून चालणार नाही.
नऊ महिन्यात अशी साखर कारखान्याची उभारणी करणे म्हणजे साधी गोष्ट नाही. तसेच राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत नेतृत्वात व कार्यकारी संचालक संचालक केशव उर्फ विक्रम सावंत यांच्या पुढाकाराने व सर्वांच्या सहकार्याने ही कारखान्याची उभारणी होत आहे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भैरवनाथ शुगर समूहाने भाडेतत्त्वावर घेतलेला आहे त्याचे बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रम चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
भैरवनाथ शुगर्स युनिट ०६ या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस चेअरमन अनिल सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक विक्रम सावंत यांनी केलेले आहे.
तेरणा पट्टा पुना गजबजणार व तेरणेला अच्छे दिन येणार हे नक्कीच होणार होते. आणि ते डॉ. सावंत यांनी करून दाखवले अशी कारखाना परिसरात चर्चा आहे. आता तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना लातूर , कळंब व धाराशिव या तीन तालुक्यातील साधारणता १७० गावांचा संपर्क असलेला. तेवढाच कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे तेव्हा आता शनिवार रोजी ज्यावेळेस हा कार्यक्रम सोहळा संपन्न होईल. १७० गावात जल्लोष झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की होय.