व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांचा सत्कार
उस्मानाबाद /सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा
औरंगाबाद परिमंडळ विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, कुंदन शिंदे, कलीम मुसा, अजित माळी, प्रशांत मते,आदींसह पत्रकार उपस्थित होते.