>

पिक नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना द्यावी शेतकरी बांधवांना आवाहन: रवींद्र माने


 पीक नुकसानीची तक्रार विमा कंपन्यांना द्यावी ,शेतकरी बांधवांसाठी आवाहन: रवींद्र माने

 जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा )

काल दिनांक 21 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झाल्याचे फोन येत आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांनी नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला 72 तासाच्या आत देणे आवश्यक आहे. काल धाराशिव तालुक्यातील -धाराशिव शहर, धाराशिव ग्रामीण, पाडोळी, केशेगाव, परंडा तालुक्यातील- परांडा, आसू ,जवळा, अनाळा सोनारी, भूम तालुक्यातील -आंबी, वालवड व इट, कळंब तालुक्यातील- कळंब, वाशी तालुक्यातील -पारगाव या महसूल मंडळामध्ये पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या सूचनेप्रमाणे तात्काळ विमा कंपनीकडे तक्रारी दाखल पूर्वसूचना द्याव्यात. पूर्व सूचना देताना पावसामुळे नुकसान(inundation) या बाबी अंतर्गत नुकसान झाल्याचे नमूद करावे. जी मंडळे 25% अग्रीममसाठी पात्र आहेत व ज्या ठिकाणी पाऊस पडला असेल त्यांनी सुद्धा विमा कंपनीकडे नुकसान झाल्याच्या तक्रार दाखल केल्यास अधिकचा पिक विमा मिळू शकतो. एका अर्जासाठी एक पूर्वसूचना व त्यात पिके निवडायचे आहेत त्यामुळे सर्व गट नंबर निवडून पूर्व सूचना द्यावी. पूर्वसूचना नंतर येणारा डॉकेट आयडी जपून ठेवावा. पूर्वसूचना देताना  play store वरून crop insurance app डाउनलोड करून त्याद्वारे अथवा hdfc ergo कंपनीचा टोल फ्री क्रमांक(18002660700)किंवा विमा कंपनीचा ईमेल आयडी pmfby.maharashtra@hdfcergo.com,किंवा Pihu या व्हाट्सअप नंबर वर(7304524888) hi टाकून येणाऱ्या सूचनांप्रमाणे तात्काळ पूर्व सूचना द्याव्यात.

Post a Comment

Previous Post Next Post