>

आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र नंबर वन बनविणार : आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत


 आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला 'नंबर वन' बनवणार  - आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

महाराष्ट्रात आयुष्यमान भव: योजनेचा प्रारंभ

धाराशिव: (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी झोकून देऊन काम करत असून, जनतेच्या सहभागाद्वारे महाराष्ट्राला आरोग्य क्षेत्रात सर्वांगीण आरोग्य सुविधा पुरविणारे देशातील 'नंबर वन' राज्य बनवणार, असा निर्धार राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला.

सर्व वयोगटातील स्‍त्री-पुरुषांसाठी “आयुष्यमान भव:” ही महत्‍वांकाक्षी मोहिम  राज्‍यभर राबविली जाणार आहे. या मोहिमेचा उद्देश हा गावपातळीपर्यंत सर्वसमावेशक गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा- सुविधा पुरविणे व जनजागृती करणे हा आहे. या मोहिमेदरम्‍यान 'आयुष्‍मान आपल्‍या दारी ३.०', आयुष्‍मान सभा, आयुष्‍मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्‍तदान मोहिम, अवयवदान जागृती मोहिम, स्‍वच्‍छता मोहिम व वय वर्ष 18 वरील पुरुषांची आरोग्‍य तपासणी मोहिम असे उपक्रम विशेष मोहिम म्‍हणून राबविण्‍यात येणार आहेत. तरी सर्व जनतेने आयुष्‍मान भव: या मोहिमेचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले.



Post a Comment

Previous Post Next Post