>

महागाई , दुष्काळाचा फटका महायुतीला बसणार ?


 महागाई,दुष्काळाचा फटका महायुतीला बसणार ...?

 अनुदानात भेदभाव का?

धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा) महागाई दुष्काळाचा फटका महाविद्यालयाला बसल्याशिवाय राहणार नाही अशी जनतेत चर्चा असल्याचे दिसून येत आहे.

    धाराशिव जिल्हा असतच दुष्काळ आणि होरपळलेला आहे. माहितीच्या काळात अनुदान पिक विमा मिळालेल्या बद्दल शासनाचे धन्यवाद. येथे मात्र अनुदानात फार मोठा फटका बसण्याची महायुतीला शक्यता आहे.

 

१३५०० ठरले व आठ हजार देण्याची कबूल झाले..

धाराशिव ,लोहारा वाशी या तीन तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर केले मात्र त्यांना अनुदान आठ हजार रुपये मिळत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.


बाकीच्या तालुक्याचे काय

तुळजापूर, भूम, परंडा, कळंब उमरगा आधी चार तालुके दुष्काळापासून वंचित राहिलेले आहे. धाराशिव तुळजापूर धाराशिव कळंब तालुके शेजारी शेजारी असून या तालुक्यात पाऊस कशी असू शकते हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे जनता विचार करणारे मात्र नक्की आहे.


राज्यातील सत्ता महायुतीकडे

 मात्र धाराशिव जिल्ह्यावर अन्याय..

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत, आमदार राणाजगजीतसिंह पाटील , आमदार ज्ञानराज चौगुले, हे सत्ताधारी पक्षाचे असताना सुद्धा धाराशिव जिल्हा उर्वरित तालुक्यावर अन्यायका असा प्रश्न देखील पडलेला आहे.

   त्यामुळे काय होणार राहणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


एवढे सर्व करून  महायुतीची अडचण होणार आहे

      देशात वाढती महागाई सर्वांचा होणारा वारंवार त्रास  यात बरेच काही साम्य असलेले दिसून येत आहे. तेव्हा शासन काय करते याकडे सुद्धा पाहणे अत्यंत गरजेचे आहे. शेवटी जनता ही सर्वस्व असते त्याला न्याय देणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा शासनाने फेरविचार करून मतदानानंतरही तरी सर्व धाराशिव जिल्हा दुष्काळात घ्यावा व त्यांना न्याय द्यावा हेच सांगणे आहे

     



अनुदान विम्यासाठी राणाजगजीत सिंह पाटील आग्रही.

भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे अनुदान व पिक विम्यासाठी सतत आग्रही असतात. त्यांनी पिकविण्यासाठी बरेच प्रयत्न सुद्धा केलेले आहेत मात्र अनुदानासाठी त्यांनी प्रयत्न करूनही शासनाने त्यांचे काय केले नाही हे मात्र चर्चा करण्याची वेळ आहे.

केंद्रातले जरी सरकार तेच राहणार असले तरी महाराष्ट्रात फटका बसणार !

केंद्रातले जरी सरकार तेच राहणार असले तरी महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची चिन्हे असतील दिसत आहे. कारण महागाईचा फटका दुष्काळाचा झटका हा मात्र असू शकतो याबद्दल कुठले दुमत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post