विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हा लोकशाहीसाठी घातक -डॉ.प्रतापसिंह पाटील
धाराशिव (सा. संत गोरोबा काका समाचार वृत्तसेवा)
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो निकाल लोकशाहीसाठी घातक आहे आणि आपली हळूहळू वाटचाल हुकूमशाहीकडे होते की काय? अशी शंका सध्या माझ्यासह सर्व नागरिकांना वाटू लागली आहे.लहान मुलाला जरी विचारलं शिवसेना कोणाची तरी उत्तर ठाकरे यांचीच असे येईल तरीदेखील विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल आणि सांगितलेली कारण ही हास्यास्पद आहेत.खरं म्हणजे हा निकाल सर्वसामान्य माणसांनी अगोदरच गृहीत धरला होता त्याप्रमाणेच आहे. कारण भाजपची राज्यात केंद्रात सत्ता असल्यामुळे सत्तेचा दुरुपयोग होणार आणि कोणीतरी भाजपचा एखादा नेता निकालाची स्क्रिप्ट लिहून देईल आणि त्याचे वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करतील अशीच चर्चा सर्वसामान्य लोकांमध्ये होती आणि त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे हा निकाल म्हणजे लोकशाहीसाठी कलंक आहे. हा निकालाचा दिवस भविष्यात काळा दिवस म्हणून नोंद होईल.